हि बातमी ईतर भाषेत वाचा
ताज्या घडामोडी

बेघर होलार समाज बांधवांना हक्काचे घर बांधण्यासाठी जागा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी – नारायण आवटे

फलटण तालुक्यातील होलार समाज संघर्ष समिती फलटण आणि होलार समाज यंग ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रांत अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन

( जावली/अजिंक्य आढाव) बेघर होलार समाज बांधवांना हक्काचे घर बांधण्यासाठी जागा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी अशी फलटण येथील तहसील कार्यालयात मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी फलटण तालुक्यातील होलार समाज संघर्ष समिती फलटण आणि होलार समाज यंग ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रांत अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

होलार समाज संघर्ष समिती फलटणचे मार्गदर्शक नारायण आवटे यांच्या मार्गदर्शनाने युवक नेतृत्व संदीप गोरे आणि होलार समाज यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते महेंद्र गोरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन दिले.
होलार समाजामध्ये बेघर लोकांचे प्रमाण जास्त आहे.तसेच अनेकांनी बेघर असल्याने शासकीय, गायरान, फॉरेस्ट मध्ये अनेक वर्षांपासून अतिक्रमण केले आहे.त्यांना राज्यामध्ये इतरत्र कोठेही जागा नाही . त्यांच्या नावावर जागा किंवा घर यापैकी काहीही नसल्याने शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ होलार समाजाला घेता येत नाही.हिच अडचण लक्षात घेऊन समितीचे मार्गदर्शक नारायण आवटे यांनी तातडीने शासकीय विश्रामगृह फलटण येथे बैठक बोलावून बेघरांचे यादी तयार केली .

यावेळी होलार समाज यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी मनोगत व्यक्त करताना राज्यातील प्रत्येकाला घर असणे हा त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे वेळप्रसंगी आपल्याला समाजाला न्याय मिळवून रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे असे सांगितले. युवक नेतृत्व संदीप गोरे यांनी होलार समाजातील युवकांनी एकत्रितपणे काम करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे तर आणि तरच आपल्याला समाजाला न्याय देता येईल असे मत व्यक्त केले.

यावेळी बेघरांचे नाव नोंदवण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी सस्तेवाडी ,सुरवडी, निरगुडी,ढवळ , चव्हाण वाडी ,टाकळवाडे, चौधरवाडी,मिरगाव,मठाचीवाडी,विडणी, शिंदेवाडी, साखरवाडी, फडतरवाडी, बरड या गावातील समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!