ताज्या घडामोडी
दहा दिवसात राऊतवाडी बंधार्यात उरमोडीचे पाणी देण्याच्या आ गोरे यांच्या फोनवरील आश्वासनाने सिन्हा यांचे उपोषण स्थगित
मंञी महादेव जानकर यांचा पाणी प्रश्नासाठी पाठिंबा
माजी मंत्री महादेव जानकर
शेतकरी बांधवाच्या पाणी प्रश्नासाठी मी स्वता तुम्हाला पाठिंबा देत असून या बाबत संबधित वरिष्ठ अधिकारी यांचे बरोबर नदीत पाणी सोडण्या बाबत चर्चा करणार आहे असे म्हणुन आंदोलनास पाठीबा दिला यावेळी बबनदादा विरकरी, आपासाहेब पुकळे, दादासाहेब दोरगे,आकाश विरकर, आदी सहभागी झाले.
(म्हसवड /प्रतिनिधी) : – उरमोडीचे पाणी राऊतवाडी बंधार्यात येत्या दहा दिवसात सोडून या भागातील शेतकरी, जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येईल असे आ जयकुमार गोरे यांनी उपोषणकर्ते माजी नगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते विजय सिन्हा यांना फोनवरुन आश्वासन देवून आपले उपोषण मागे घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर सोमवारी रात्री १०.२० वाजता उपोषण सोडण्यात आले यावेळी अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला तर काही सिन्हा समर्थकांनी स्मशानभूमी समोरच फटाक्यांची अतिशय बाजी करण्यात आली यावेळी सपोनि राजकुमार भुजबळ यांनी विजय सिन्हा यांना सरबत देवून उपोषण सोडले १९७० ते १९८० सालातील विजय सिन्हा यांनी एकाद्या आंदोलनाचा इशारा दिला तर जिल्ह्याचे पोलिस प्रमुख, जिल्हाधिकारी, रोजगार हमीच्या अधिकारी सकाळ पासून म्हसवड मध्ये ठाण मांडून बसत सातारा पंढरपूर रोडवर दिवसभर हजारो नागरीक त्यांच्या हाकेला येवून आंदोलन करत मग ते रस्ता रोको असो, रस्त्यावर जनावरे बांधणे, अधिकारी यांच्या तोंडाला काळे फारसे, गेहरावा घालणे पाण्यासाठी हांडा मोर्चा, अधिकारी यांस कोंडणे आदी विजय सिन्हा, दिलीप तुपे मनोहर डोंगरे, कै नंदू लोखंडे , महादेव सरतापे, शशी देठे, शहाजी लोखंडे, भारत लोखंडे , रसाळ, आधीच्या आंदोलनाचा धसका प्रशासनाने त्या काळात घेतला होता स्व. माजी पंतप्रधान जयप्रकाश नारायण, बाबा आढाव, निळू फुले एस एम जोशी, पाशा पटेल पार्थ होळकर, विजय मांडके आदी त्याकाळात आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुक्कामी म्हसवडला येत रोजगार हमी, लाॅग मार्च, मराठवाडा नामांतर आदी प्रश्नासाठी अनेक वेळा जेलच्या वारर्या करणारे विजय सिन्हा यांनी त्या नंतर आज प्रथमच आंदोलन करुन ७०च्या दशकातील विजय सिन्हा काय हे काल उरमोडीच्या अधिकारी वर्गाला दाखवून दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप, किशोर सोनवणे, सचिन लोखंडे, परेश व्होरा आदीनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला
काल या आंदोलनात सहभागी इंजि. सुनील पोरे, कैलास भोरे, विजय धट, नितीन दोशी, हणमंत राखुंडे, बबन आबदागिरे, माजी नगराध्यक्ष सुरेश म्हेत्रे, माजी नगरसेवक अकिल काझी,करण सिन्हा, करण पोरे, तुळशीराम गोरड, शिवाजी लोखंडे अंकुश लोखंडे, सह चेतना सिन्हा, वनिता पिसे, आदी शेकडो महिला पुरुषांनी या आंदोलनात रात्री आठ वाजेपर्यंत हजेरी लावली होती
तब्बेत खालावली उपचार घ्या, अन्यथा कारवाई
सपोनि राजकुमार भुजबळ