हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

गिरवी ग्रामस्थ व सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व अधिकाऱ्यांचा सन्मान

 फलटण : 76  व्या स्वातंत्र दिनाच्या संध्येला फलटण तालुक्यातील गुणवंत आणि यशवंत पोलिस उपनिरीक्षक (PSI), सहाय्यक सरकारी वकील (वर्ग-१) यांचा सत्कार समारंभ सोहळा गिरवी ग्रामस्त आणि सिद्धार्थ तरुण मंडळ, गिरवी यांच्या वतीने करण्यात आला.

उच्च पदावर विराजमान झाल्यावर जबाबदारी वाढते आणि समाज तुमच्याकडून आदर्श घेतो, तुम्हीही महापुरुषांचा आदर्श घेऊन समाजामध्ये आदर्श काम करावे अशी अपेक्षा माजी प्रा. एम. टी. ढोले सर यांनी या सत्कार समारंभात अध्यक्ष म्हणून बोलताना व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून फलटण तालुक्यातील तरुणांचा आदर्श मा. प्रतिक आढाव साहेब नायब तहसीलदार हे उपस्थित होते आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सहजासहजी यश मिळत नाही त्यासाठी चिकाटी आणि जिद्द तरुण मुलांनी ठेवली पाहिजे आणि पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे मार्गदर्शन केले. तसेच जातीपाती पलीकडे जाऊन समाज सुधारकांनी एकसंघ समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अधिकार्यांनीही जातीपलीकडे जाऊन समाजाचे काम करावे असे प्रतिपादन मा. संदिप जाधव सर, संस्थापक/ अध्यक्ष “जय हो” करीयर अकॅडमी यांनी केले.

या कार्यक्रमाची सुरवात महापुरुषांच्या प्रमिता पूजन आणि भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून करण्यात आले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले यशवंत विद्यार्थी कु. पूजा संजय मदने (गिरवी), सौ. सुवर्णा सागर लोंढे (मिरढे), श्री. अजय सुनिल मिसाळ (फलटण), श्री. स्वप्नील हनमंत बनकर (निंबळक) यांचा सत्कार भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. त्यावेळी पुजा मदने आणि अजय मिसाळ यांनी अपयशाने खचून जाऊ नका सातत्य आणि चिकाटी ठेवा आणि कुटुंबीयांनी त्यांना धीर आणि प्रोस्ताहन द्या असे अवाहन केले. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट-अ, (राजपत्रित) या परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या फलटण तालुक्यातील वकील अँड. माने वर्षा भारत/ सौ. वर्षा अजय सोनावणे, अँड. अहिवळे शितल किरण, अँड. देशमाने प्रतिक भारत, अँड. बांदल क्षमा हनुमंत, अँड.अहिवळे नम्रता शिवाजी यांचाही सत्कार भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला त्यावेळी सौ. वर्षा माने-सोनावणे आणि सौ. शितल अहिवळे- भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, यश मिळविण्याचा मार्ग कठीण आहे आणि त्याहून हि कठीण आहे यश टिकवणे. परिस्थिती वरती मात करणे गरजेचे आहे सतत परिस्थितीला दोष देऊ नका. स्वप्न मोठे बघा आणि त्या दिशेने वाटचाल करा यश नक्कीच मिळेल. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गिरवी मध्ये कोतवाल या पदावर यश मिळविलेले श्री. विवेक अतुल निकाळजे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच विशेष सत्कार म्हणून मा. निलेश धेंडे, ASO मंत्रालय, महाराष्ट्र राज्य या पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल, अँड. अजित चाँद पठाण हे बिनविरोध फलटण तालुका वकील संघाचे अध्यक्ष म्हणुन नियुक्ती झाल्या बद्दल, मा. दिगंबर गायकवाड गुरुजी यांनी ८ वी च्या मुलांना NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल, मा. लक्ष्मण अहिवळे, सातारा जिल्हा उत्कृष्ठ तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि मा. सिद्धार्थ प्रबुद्ध संस्थापक/अध्यक्ष AIM यांनी परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समुपदेशन केंद्र सुरु केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी दहावी आणि बारावी मध्ये यश मिळविलेले विद्यार्थी कु. प्रतीक्षा सुरेश शिंदे ९३.४०%, कु. प्रतिक्षा महेंद्र जाधव ९१.६०%, कु. चैतन्य दत्तात्रय जाधव ९०.६०% दहावीमध्ये तर कु. अंकिता संतोष रणवरे ७४.१७%, कु.साक्षी दत्तात्रय मदने ७३.३३%, कु. प्रतिक्षा दीपकराव मदने ७२.८३% यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गिरवी गावचे प्रथम नागरिक सौ. वैशालीताई कदम, गिरवी ग्रामपंचायत सदस्य सौ. अश्विनी नितिन निकाळजे, सौ. अश्विनी स्वप्नील निकाळजे, सावली संस्थेच्या सचिव सौ. रुपाली माने-निकाळजे, पै. संजय मदने, रामभाऊ कदम, संजय कदम, आनंदराव जाधव, कुंडलिक निकाळजे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत मा. राजेंद्रप्रसाद निकाळजे सर, भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन मा. अरविंद निकाळजे सर, सूत्रसंचालन अँड. सुजित निकाळजे तर आभार मा. पांडुरंग निकाळजे सर यांनी मानले. कार्यक्रमासाठी गिरवी ग्रामस्त, निकाळजे परिवार आणि सिद्धार्थ तरुण मंडळ कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मा. योगेश धेंडे, तलाठी जाधववाडी, उपळवे यांनी मोलाचे कष्ट घेतले, मा. अमित निकाळजे, सदस्य, गिरवी ग्रामपंचायत, मा. नितिनबाबा निकाळजे, मा. स्वप्नील निकाळजे आणि सर्व निकाळजे परिवाराने मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!