गोखळी (प्रतिनिधी) लडाखमध्ये लष्कराच्या वाहनास झालेल्या अपघातात राजाळे ता.फलटण येथील वैभव संपतराव भोईटे (वय ३१) जवान शहीद झाल्याचे वृत्त गावात येताच.सपूर्ण राजाळे आणि परिसरावर शोककळा पसरली वैभव संपतराव भोईटे सन २०१८ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाला होता त्याची सैन्यदलात सेवा ४वर्ष झाली .
यांचे पार्थिव उद्या सोमवारी दुपारी राजाळे येथे येईल शासकीय इतमानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत असे पोलिस पाटील महेश शेडगे यांनी सांगितले.श निवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास दक्षिण लढाख मधील न्योमा जिल्ह्यातील कियारीजवळ ही घटना घडली.लढाख कियारी जवळ सात कि मी.अतरावर ही घटना घडली.हे जवान गॅरीस हून लेहजवळच्या क्यारी शहराच्या दिशेने निघाले होते.वैभव यांच्या पश्चात पत्नी प्रणाली ,मुलगी हिंदवी (वय वर्षे दिड वर्ष) ,आई बिबीताई , वडील संपतराव धोंडीबा भोईटे, दोन विवाहित बहिणी दोन चुलते मोहन भोईटे व विलास भोईटे जेलर अधिकारी आहेत असा परिवार आहे.