हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

हणमंतवाडी प्राथमिक शाळेचा वर्धापन दिन साजरा

 गोखळी ( प्रतिनिधी ): फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील हणमंतवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेचा ६६ वा वर्धापनदिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने शाळेची संपूर्ण इमारत रंगीबेरंगी फुलांनी, वर्गांना तोरण हा रांगोळीने सजावट करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छ . शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. पाहण्याचा हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ रुपालीताई भरत जाधव होत्या . यावेळी. उपसरपंच विक्रमसिंह बाळासाहेब जाधव व सर्व सदस्य, व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल संपत चव्हाण, उपाध्यक्ष सौ साधना साळवे व सदस्य, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळा वर्धापन दिनाच्या निमित्ताने शाळेविषयी जुन्या नव्या आठवणींना पाहुण्यांनी उजाळा देऊन यापुढे दरवर्षी शाळेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा मनोदय ग्रामस्थांनी व्यक्त केला.

शाळेविषयी गौरवोव्दार काढले ,मुख्याध्यापक गावडे गुरुजी यांनी सुत्रसंचालन केले, सौ निलम कोकाटे यांनी शाळे विषयी माहिती दिली, श्रीमती मोनाली झेंडे मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
विद्यार्थी व उपस्थित सर्वांना शिक्षकांच् वतीने मिष्टान्न जेवण दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!