(म्हसवड/ प्रतिनिधी) महाराष्ट्रात पत्रकारावरील वाढते हल्ले व महाराष्ट्र शासनाने पत्रकारांच्या संरक्षणासाठी केलेले कायदे याची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्रातील पोलीस टाळाटाळ करत असल्याने कायदा कुचकामी ठरत असल्याने त्या तो कायदा कठोर करावा पळवाटा निघणारा कायदा नको या मागणीसाठी महाराष्ट्रात सर्वत्र पळवाटा निघणार्या कायद्याची होळी पत्रकार बांधवांनी केली तर म्हसवड मध्ये पाचोरा येथील आ किशोर पाटील व त्यांच्या सहकारी गुंडांनी पत्रकार यास मारहाण करुन शिवीगाळ केल्याचा निषेध करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
या मागणीचे निवेदन म्हसवड येथील तलाठी कार्यालयात पत्रकार मंडळीनी एकत्र जमून सपोनि राजकुमार भुजबळ तलाठी कार्यालयाचे अंगुली बनसोडे यांना निवेदन दिले यावर म्हसवड प्रेस क्लब व सोशल मिडियाचे अध्यक्ष नागनाथ डोंबे, उपाध्यक्ष शंकर पानसांडे, माण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन मंगरुळे, ईलेक्ट्रॉनिक मिडियाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पानसांडे ,विजय टाकणे, एल के सरतापे, अहमद मुल्ला, शहाजी लोखंडे उपस्थित होते