हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

माण खटाव मध्ये पाणी आणल्याचा व कोव्हीड मध्ये माणसांना वाचवण्याचा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद – आ जयकुमार गोरे

(म्हसवड /प्रतिनिधी) तालुक्याचे किंगमेकर स्व. माजी आ सदाशिवराव पोळ तात्या हे राजकीय व्यक्ती म्हणून मी त्यांचा कायमच आदर केला त्यांच्या राजकारणाची त्यांच्या शिवाय कोणाला जमली नाही आणि जमणार हि नाही त्यांची काम करायची पद्धत वेगळी होती आणि माझी वेगळी आहे तात्याची कार्यकर्त्यावरील असलेल्या निष्ठेमुळे तात्या जिवंत होते तो पर्याय त्यांचा कार्यकर्ता हालचाल नाही मात्र तात्या नंतर आलेले नेतृत्व कुचकामी ठरले तात्या बंदा रुपये होते तात्या कडुन राजकारण कसे करावे हे शिकावे असे म्हणून आ गोरे पुढे म्हणाले मी समाधानी आहे दोन गोष्टी बदल कोव्हीड मध्ये काम करुन अनेकांचे जिव वाचवले तर दुसरे दुष्काळी माण मध्ये पाणी आणले यांचयांचा आनंद व समाधान आहे, डॉ संदिप पोळ तुम्हाला लोक देव समजतात लोकांची सेवा मनापासून करा माझे तालुक्यात मोठे हाॅस्पिटल उभे करण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण करणार असे आ जयकुमार गोरे यांनी म्हसवड येथे हाॅस्पिटल उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.


दहिवडी येथील बालरोग तज्ञ डॉ संदिप पोळ व डॉ भारती पोळ या पती पत्नीनी म्हसवड येथील जय भगवान मल्टीस्पेशेल हाॅस्पिटल या ठिकाणी लहान मुलांचे हाॅस्पिटल सुरु केले त्याचे उदघाटन माण खटावच्या आ जयकुमार गोरे, म्हसवड पोलिस ठाण्याचे एपीआय राजकुमार भुजबळ, डाॅ विवेक माने,डॉ कुंभार, सौ. डॉ कुंभार मॅडम, डॉ ओंबासे, भाजपा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, मार्केट कमिटीचे चेअरमन विलासराव देशमुख, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, माजी नगराध्यक्षविजय धट, माजी नगराध्यक्ष वसंत मासाळ,उपाध्यक्ष धनाजी माने, अकिल काझी, वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण कोडलकर, इंजि. सुनील पोरे, डॉ राजेंद्र मोडासे, डॉ चंद्रकांत साबळे, डॉ राजेश शहा, माजी जिप सदस्य बाळासाहेब काळे, उज्वलकुमार काळे, अॅड लक्ष्मण हंगे, काका माने, आप्पासाहेब पुकळे, विजय बनगर, आदी उपस्थित होते.


प्रथम म्हसवड येथील प्रसिद्ध डॉ राजेंद्र खाडे यांच्या जय भगवान हाॅस्पिटल मध्ये डॉ संदिप पोळ यांनी लहान मुलांचे हाॅस्पिटल सुरू केले त्याचे फित कापुन उदघाटन आ जयकुमार गोरे, एपीआय राजकुमार भुजबळ, डॉ कुंभार, डॉ माने आदीच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्वानी हाॅस्पिटलची पहाणी केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येवून डॉ संदिप पोळ यांनी आ जयकुमार गोरे यांचा सत्कार केला तर उपस्थित मान्यवरांचा सत्कार डॉ माने, डॉ कुंभार, आदी मान्यवर मंडळीनी केला.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ जयकुमार गोरे म्हणाले अनेकांना प्रश्न पडला आहे कि तात्यांच्या मुलांचे व सुनबाई यांच्या हाॅस्पिटलचे उदघाटन माझ्या हस्ते व्हावे हे माझ्या साठी एक वेगळा योगाच म्हणावा लागेल अनेकांना हे समीकरण कसे जुळले काम करणारे आसले कि आपोआप चांगली माणसे एकत्र येतात त्या प्रमाणे आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहे मात्र काही माणसांना विकासाचं देण घेण नाही मात्र घरे फोडण्यात पटाईत आहेत तालुक्यातील तात्याचे वलय संपवाय निघालेल्या या मंडळीनी तात्याना जो गोतावळा जमवला होता तो हि टिकवता आला नाही असो डॉक्टर आपल्या पत्नीनी आपला स्वभाव व आपली माहिती दहिवडी केलेले काम कसे केले सांगितली डाॅक्टरला लोक देव समजून विश्वास ठेवतात त्यामुळे मी कोव्हीड मध्ये माणसांची उपचारा विना तडफड पाहिली आहे कोव्हीड मध्ये केलेले काम अनेकांना जिवदान देणारे ठरल्याचा वेगळा आनंद आहे तर दुसरा तालुक्यात पाणी आणल्याचा दुसरा आनंद मला आहे हि दोन कामे माझ्या आयुष्यातील महत्त्वाची कामे आहेत एक काम राहिले आहे ते म्हणजे तालुक्यात चांगले हाॅस्पिटल उभा करायचे स्वप्न होते ते कोव्हीड मुळे जमले नाही ते आगामी काळात पूर्ण करणार असल्याचे आ जयकुमार गोरे यांनी सांगितले.

यावेळी जिप सभापती डॉ भारती पोळ यांनी प्रस्तावना करताना डॉ संदिप पोळ यांचे शिक्षणापासून वैद्यकीय सेवेची त्यांच्या तापट स्वभावा विषयी माहिती सांगितली डॉ चंद्रकांत साबळे यांनी शुभेच्छा दिल्या तर डॉ संदिप पोळ म्हणाले दहिवडी येथे १९ वर्षे बालरोग तज्ञ म्हणून उपचार केले सिध्दनाथ व जोगेश्वरी च्या पावण नगरीत ओपीडी सुरु करणे हे माझे अनेक दिवसाचे स्वप्न होते ते आज पूर्ण होत असल्याचे डॉ पोळ म्हणाले
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार विठ्ठल काटकर यांनी करुन आ गोरे यांनी वेगळी शाब्बासकिची थाप दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!