हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

गोखळी परिसरात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 गोखळी.( प्रतिनिधी ) फलटण पूर्व भागातील मौजे गोखळी येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आपल्या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान होण्या करता व शहीद जवानांना शतशः नमन करण्यासाठी गोखळी ग्रामपंचायत वतीने माजी सैनिक दत्तात्रेय जगताप , गोविंद भाऊ जाधव , अशोक फडतरे, राजाराम घाडगे व निवृत्त पोलीस उपनिरीक्षक रोहिदास जाधव यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले.

(फोटो:हणमंत दिनकर जगताप यांच्या तर्फे हनुमान विद्यालयात समाज सुधारक राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा भेट देताना )

सर्व माजी सैनिकांचा यावेळी गोखळी ग्रामपंचायती च्या वतीने शाल,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा प्राथमिक शाळा गोखळी चे ध्वजारोहण डॉ. राधेश्याम गावडे ग्रामपंचायत गोखळी चे माजी उपसरपंच बाळासाहेब आटोळे गोखळी सोसायटीचे डॉ.राधेश्याम गावडे सिद्धिविनायक रुग्णालय व श्रीराम पतसंस्था विकास फडतरे सातारा जिल्हा बँक सरपंच सुमन हरिभाऊ गावडे हनुमान सोसायटी गजानन गावडे प्राथमिक उप आरोग्य केंद्र सरपंच सुमन हरिभाऊ गावडे हनुमान माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज गोखळीचे विद्यालयामध्ये बारावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कुमारी शिवानी मदने यांच्या हस्ते संबंधीत संस्थांच्या कार्यालया समोर ध्वज फडकवण्यात आला. प्रारंभी गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरी मध्ये अंगणवाडी , प्राथमिक शाळा, हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक, अंगणवाडी सेविका , मदतनीस व ग्रामस्थ ,पालक,माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.कार्यक्रमाची सांगता हनुमान विद्यालयाच्या पटांगणावर झाली.राष्टूगीत, ध्वजगीत,राज्यगीत , सामुहिक कवायत , चिमुकल्यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मनोगते व्यक्त केली.इयत्ता पहिली ते बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा रोख बक्षीसे व गुलाबपुष्प देऊन गौरव. हणमंत दिनकर जगताप यांनी हनुमान विद्यालयास भेट दिलेल्या समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा प्राचार्य अभंग सर यांच्या कडे स्वाधीन केल्या.

.तसेच माजी सरपंच नंदकुमार गावडे आणि बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध बापू गावडे यांनी वीटभट्टी कामगारांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. सुखदेव येडे यांनी अंगणवाडी, प्राथमिक शाळा व हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप केले. ग्रामपंचायत , विकास सोसायटी , पतसंस्था, पालकांनी विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या गोळ्या बिस्किटे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली. करण्यात आला . हनुमान युवक मंडळाच्या वतीने आयोजित गौरी सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ , शिक्षणप्रेमी पालक वर्ग, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक , माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. स्वागत प्राचार्य हरीभाऊ अभंग सर,सूत्रसंचालन राधेश्याम जाधव तर आभार किरण पवार सर यानी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!