हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

ऐन पाणी टंचाईच्या काळात मसाईवाडी बोनेवाडी परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली आ गोरे ; उरमोडीच्या पाण्याचा कल्लोहळच्या नागोबाला जलाभिषेक

विशेष

1)मसाईवाडी येथील तलावात उरमोडीचे पाणी आ गोरे यांनी आणले त्याचे पुजन सुवासिनींनी केले

2)धनगर समाज्याचे आराध्यदैवत असलेल्या कल्लोहळच्या नागोबा देवालयात उरमोडी च्या पाण्याचा अभिषेक

3) राऊतवाडी, माने वस्ती, खासबाग आदीनी शेतकरी बांधवांनी विज बिलाचे पैसे जमा केल्यास त्यांना हि पाणी सोडणार

4) उर्वरित शेंबडेवस्ती माने वस्ती, शिंदे वस्ती, पंत वस्ती या भागातील शेतकरी बांधवांनी लाईट बिलाचे पैसे जमा केल्यास मसाईवाडी प्रमाणे त्यांना हि सोडणार

5) दहिवडी मळा रस्त्याचा प्रश्न लवकरच सोडवणार

(म्हसवड /प्रतिनिधी) माण खटावच्या दुष्काळी मातीच्या शिवारात ऐन पाणी टंचाईच्या परिस्थितीत उरमोडीचे पाणी मसाईवाडी, बोनेवाडी, नागोबा मंदिर परिसर, कबीर वस्ती, माने वस्ती, दहिवडी मळा, गुरवकी,विरकरमळवी आदी शेतकरी बांधवांच्या बांधावर उरमोडीचे पाणी आल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत झाला दुष्काळी माणच्या पट्ट्यातिल माझ्या शेतकरी बांधवातील शेती सुजलाम सुफलाम होऊन शेतात ऊस, डाळिंब, द्राक्षे, चिक्कू, अंब्यासारख्या बागा फुललेल्याचे पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे ते तुम्ही सामान्य कुटुंबातील पोराला तिन वेळा आमदार केले म्हणून तर आज तुमच्या आशिर्वादामुळेच श्रीक्षेत्र कल्लोहळचा राजा नागोबा रायाला उरमोडीच्या पाण्याचा अभिषेक घातल्याचा खरा आनंद मला आज झाला असल्याचे आ जयकुमार गोरे यांनी मसाईवाडी तलावात उरमोडीच्या पाण्याचे पुजन करतेवेळी व्यक्त केले.

मसाईवाडी परिसरात दुसऱ्यांदा उरमोडीचे पाणी आले असून पहिल्या आले त्यावेळी माण तालुका भाजपा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष व आ गोरे यांचे विश्वासू विजय सिन्हा, चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय धट, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, इंजि. सुनिल पोरे,साळूबाई कोळेकर, शरद कोळेकर, आप्पासाहेब पुकळे, तुळशीराम गोरड, मारुती विरकर, शंकर विरकर,बंटी माने धनाजी माने सह मसाईवाडी, विरकरवाडी, बानगरवाडी राऊतवाडी, दहिवडे माळा, नागोबा वस्ती, कबीर मळा, खासबाग झगडे, केवटे,शिवाजी नगर मधील हजारो नागरीक यावेळी उपस्थित होते.

यावेळी आ गोरे म्हणाले मी सामान्य शेतकर्याचा मुलगा आहे म्हणून मला शेतकर्याचा जाण आहे पहहिल्या पासून माझे ध्येय होते ज्या सर्व सामान्य माण खटावच्या दुष्काळी जनतेने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून तीन वेळा आमदार केले त्या शेतकर्याच्या बांधावर पणी पोहचविणे हे माझे कर्तव्य मानून आज पर्यंत जनतेसाठी झटत आलो आणि आज त्याचे फळ डोळ्यानी पहाताना अभिमान वाटत आहे माण मधील प्रत्येक गावांना पाणी मिळाले पाहिजे हि भूमिका माझी आहे प्रत्येक गावाने हे पाणी जबाबदारीने पुढच्या गावांना कसे पोहचेल याचा विचार करावा. माण, खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक पुसण्याचे काम करण्याचा मी प्रयत्न करतोय, या मातीचे सर्वाधिक नुकसान हे पवार साहेबांनी केले आहे ते या भागाचे लोकप्रतिनिधी होते त्यावेळी त्यांनी येथील पाणी प्रश्न सोडवला असता तर येथील दुष्काळ हा 25 वर्षापुर्वीच संपला असता.मी जेव्हा निवडुन आलो त्या दिवसापासुन मी येथील पाण्यासाठी झटतोय यापुढे प्रत्येक 15 एकरावर चेंबर टाकला पाहिजे. अशी माझी भुमीका आहे, माझा जन्म हा पाण्यासाठी झाला आहे. जयकुमार गोरे हे एक पाण्याचे माध्यम आहे हे परमेश्वरालाही माहित असल्यानेच मी आज मोठ्या अपघातानंतरही तुमच्यासमोर उभा आहे. आणखी खुप कामे करायची आहेत. मी जो जो शब्द माण खटावच्या जनतेला दिलाय तो मी पूर्ण केलाय,माण खटाव मधील प्रत्येक गावांना पाणी मिळाले पाहिजे भूमिका माझी आहे प्रत्येक गावाने हे पाणी जबाबदारीने पुढच्या गावांना कसे पोहचेल याचा विचार करावा. जिहे कटापुरचे हक्काचे पाणी पुढील दीड वर्षात नक्की येणार आहे. टेंभुची सुप्रमो आजच मिळाली आहे. डिसेंबर महिन्यात येथील ४४ गावांना त्याचा लाभ मिळणार आहे. पुढच्या वर्षी विरोधकांना हिंगणी येथे जिहे कटापुरचे पाणी आणुन मीच अंघोळ घालणार आहे. विरोधकांच्या पापाचा नायनाट करण्यासाठीच हा जयकुमार गोरे रिंगणात आहे. सामान्य जनतेवर अन्याय करणार्याला सुट्टी देणार नाही. इंच इंच जमिन पाण्याखाली जोवर येत नाही तोवर माझी पाण्यासाठीची लढाई सुरूच राहणार आहे. असे ही शेवटी आ. गोरे यांनी सांगितले
यावेळी तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, विजय सिन्हा, चेतना सिन्हा, शंकर विरकर आदीची भाषणे झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!