आपला जिल्हा
म्हसवड पालिकेचा वृक्षारोपण नावाला पाच वर्षात लाखो रुपये घालवले एक हि झाड जगले नाही, डॉ प्रज्ञा राऊत यांनी ८० झाडे जगवली

चांदणी चौक दरम्यान राऊत हाॅस्पिटलच्या डॉ सौ प्रज्ञा राऊत मॅडम या महिलेने माणुसकीच्या नात्याने त्यांच्या हाॅस्पिटल पासून बस स्थानकाच्या बाजूला जवळ जवळ १०० मिटर अंतरावर त्यांनी फुल झाडे लावून त्याची रोजच्या रोज निगा राखून मोठ मोठ्या शहरात ज्या प्रमाणे रस्त्याच्या मधोमध फुल झाडे आसतात तसी फुल झाडे डॉ सौ राऊत यांनी लावली व वाढवली मात्र पालिका काय करते एक महिला शंभर मीटर अंतरावर ७० ते ८० झाडे लावते मग या रस्त्याच्या उर्वरित डिवायडर मध्ये रस्त्याच्या कडेला दोन डझन हाॅस्पिटल आहेत ते माणुसकीच्या नात्याने असे समाज हिताचे उपक्रम का राबवत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आह

(म्हसवड/ प्रतिनिधी) माझी वसुंधरा, वक्षारोपण , स्वच्छता अभियान, आदी कार्यक्रमाच्या अनुशंगाने शासनाचे लाखो रुपये आलेले अनुदानातून दर वर्षी स्मशानभूमी ते विरकरवाडी, नागोबा मंदिर परिसर पोलिस स्टेशन रोड व दहिवडी म्हसवड रोडवरील पोळ पेट्रोल पंप ते प्राथमिक आरोग्य केंद्र या दरम्यानच्या डिवायडर मध्ये शोभेची फुल झाडे, सावली देणारी झाडे लावली जातात मात्र त्या झाडाचे संगोपन वेळच्या वेळी पालिकेकडून होत नसल्याने हजारो झाडा पैकी दहा झाडे हि जगली नाहीत मग दर वर्षी लाखो रुपये वृक्षारोपणाचा खर्च कोणाचे खिशे भरण्यासाठी वृक्षारोपण पालिका करते असा सवाल नागरीक करत आहेत
