हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

बाटलीच्या पायात औंधचा पोलीस ठाण्याचा कारभारी व पोलीस फौजदार लागला कामाला

(खटाव /प्रतिनिधी)खटाव तालुक्यातील मौजे औंध पोलीस ठाण्याचा कारभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बापुसाहेब नारायण जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी सुमारे १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील तत्त्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक व औंध पोलीस ठाण्याचे कारभारी दत्तात्रय परशुराम दराडे व औंध पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या बापुसाहेब नारायण जाधव या दोन सातारा पोलीस दलातील लाचखोर पोलीसांना जुना एस टी स्टँड, बाजार पटांगण, औंध, ता.खटाव, जि.सातारा काल शुक्रवारी दिनांक ११ ऑगस्ट रोजी १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.त्यांनी संबंधित पुरुष तक्रारदार यांना यांच्या परमिट रुम मधुन दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे औंध पोलीस ठाण्यात दाखल असले गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व तक्रारदार यांना त्यांच्या व्यवसायात इथुन पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी लाचखोर आरोपी लोकसेवक १)दत्तात्रय परशुराम दराडे,२)बापुसाहेब नारायण जाधव,या दोघांनी १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती.त्यानंतर तडजोडी अंती दत्तात्रय परशुराम दराडे यांच्या वतीने बापुसाहेब नारायण जाधव यांनी १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागान सातारा यांनी रंगेहाथ पकडण्यात आले असून औंध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, श्रीमती शीतल जानवे, अप्पर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि. पुणे. यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस उपअधीक्षक श्रीमती उज्वल अरुण वैद्य,पो.ना.निलेश चव्हाण, पो.कॉ.तुषार भोसले, पो.कॉ. निलेश येवले, यांनी केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्यावतीने जाहीर प्रकटन करण्यात आले आहे की, आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.

श्रीमती उज्वल अरुण वैद्य,पोलीस उपअधीक्षकलाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा मोबाईल क्र. 9823231244 कार्यालय क्र.02162-238139 टोल फ्री क्र. 1064 या फोनवरती संपूर्ण करावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!