(जावली/अजिंक्य आढाव)- जावली ता.फलटण येथील राॅयल इंग्लिश स्कूल जावली याच्यां वतीने आषाढी एकादशीनिमित्त शनिवार दि. 13 रोजी सकाळी बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. प्राचार्य समीर गावडे सर यांनी या दिंडीचे आयोजन केले होते.
या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी, पायजमा, बंडी, धोतर या पोशाखात लहान मुले तर रंगबिरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन लहान मुली सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज, टाळ – मृदंगाचा निनाद त्याला वीणाची साथ, ज्ञानोबा तुकोबांचा व विठोबा रुक्माई चा जयघोष करीत निघालेल्या दिंडीने जावलीकरांचे लक्ष वेधले होते. बाल गोपाल रुपी विठ्ठल रुक्मिणी व पालखीच्या पूजनाने दिंडीची सुरुवात झाली. जावली हायस्कूल जावली शाळेच्या प्रांगणातून भक्तिमय अभंग, गायन, हरिनामाच्या गजराने दिंडीची शोभा वाढवली त्याचप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या गाण्यातून व फलका तून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या घोषणा देऊन वृक्ष लागवडीचे महत्व गावातील नागरिकांना पटवून दिला.या दिंडीत पहिले ते बारावी चे विद्यार्थी सहभागी झाले होते.
दिंडीची सुरुवात गावातील सिद्धनाथ मंदिरापासून करण्यात आली यामध्ये विठ्ठल – रुक्माई ,संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थी दिंडी सोहळ्यातील आकर्षण ठरले.
दिंडी सोहळ्यावेळी जावली गावातील सर्व वातावरण विठ्ठल नामाच्या जयघोषाने भक्तीमय झाले होते.या सोहळयात सर्व शिक्षक,उपशिक्षक, पालक, ग्रामस्थ सहभागी झाले होते.