हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

साखरवाडी या ठिकाणी जीव धोक्यात घालून फलटण ग्रामीण पोलीस ने गांजा वाहतूक पकडली

(जावली /अजिंक्य आढाव)साखरवाडी या ठिकाणी दि ९.४.२५ रोजी पोलीस चे जागेमध्ये बुधविहार साठी जागा देत नाही म्हणून डॉ बाबसाहेब आंबेडकर व बुद्ध पुतळा बसवणेचा प्रकार घडला होता त्याबाबत गुन्हा दाखल असून त्यांनी १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती असलेने त्या ठिकाणी सार्वजनिक सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून फिक्स पॉइंट लावले आहेत व १३ व १४ एप्रिल रोजी डीबी पथक त्याच भागात कॅम्प केला होता

१४ एप्रिल रोजी सकाळी ६.२० वाजता डीबी चे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याना माहिती मिळाली की एक पंढरी स्विफ्ट कार सुरवाडी गावाकडून साखरवाडी कडे जात आहे त्यात गांजा आहे.

त्यांनी तत्काळ तिथे उपस्थीत डीबी पथक व आरसीपी दोन कर्मचारी यांचे मदतीने ती गाडी अडविण्याचा प्रयत्न केला सदर गाडीत दोन व्यक्ती होते एक चालक व एक त्याचे बाजूला बसला होता.

गाडी थांबली त्यावेळी ड्राइवर बाजूने पीएसआय बदने चालकाशी चौकशी करत असताना चालकाने अचानक दरवाजा ओढून घेतला व गाडी सुरू केली पीएसआय बदने यांचा उजवा हात दरवाजा मधे अडकला व गाडी चालकाने त्याना फरफटत नेले त्यांचे पायाचे संपूर्ण कातडी जमिनीला घासलेमुळे निघाली नंतर पुढे राम काशीनाथ भोसले यांचे शेतात सात सर्कल रोड येथे गाडी धडकून थांबली त्यावेळी सदर गाडीचा चालक पळून गेला शेजारी बसलेले व्यक्ती स्थूल असलेमुळे पळाला नाही नंतर डीबी स्टाफ तिथे पोहचला त्यावेळी स्विफ्ट डिजायर गाडीत पांढऱ्या गोणीत १०.३० किलो गांजा मिळून आला.

गाडीचा क्रमांक MH ११BH ०४०४ आहे बाजूस बसलेले इसमाने स्वतःचे नाव सांगणेस सुरवातीला नकार दिला व नंतर खोटे नाव सांगितले नंतर त्याने त्याचे नाव लक्ष्मण रामू जाधव वय अंदाजे ६० वर्ष राहणार पिलीव ता माळशिरश जिल्हा सोलापूर सांगितले पळून गेलेले इसमा चे नाव रणजीत लक्ष्मण जाधव आहे सदर इसमावर पूर्वी म्हसवड लोनंद माळशिरस या ठिकाणी ४ गांजा वाहतूक केस आहेत.

सदर गाडी शेतात गेलेने त्यालाही मुका मार आहे व तो वेदना होत असलेचे सांगत असलेने त्या ठिकाणी पोलिस अंमलदार तात्या कदम ठेवून डीबी पथक ने पीएसआय बदने व आरोपी लक्ष्मण रामू जाधव याला फलटण या ठिकाणी अर्थोपेडिक सर्जन डॉ रसाळ यांचे दवखानेत आणले त्या ठिकाणी पीएसआय बदने यांचेवर उपचार चालू आहेत लेसरेटेड. जखम आहेत आरोपी लक्ष्मण जाधव वय ६० राहणार पिलीव याला सुरवातीला रसाळ डॉक्टर नंतर सरकारी दवखाना फलटण व आता सातारा सिविल येथे एडमिट केले आहे तो स्थूल असलेने गाडी पलटी झालेवर त्याचे खुब्याचे हाडला मार लागला आहे
सदर बाबत गुन्हा क्रमांक ३०८/२५ कलम बीएनएस. १३२ १२१(१)११० ३ (५) व एनडीपीएस कायदा कलम २०(ब)प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व गुन्हीतील गाडी क्रमांक MH 11BH0404 swift पांढरी किंमत ३००००० लाख व सुका गांजा १०.३० किलो किंमत २.५ लाख जप्त केला आहे
पीएसइ गोपाल बदने यांनी या मधे जीवावर उदार होऊन गाडी अडविण्याचा प्रयत्न केला त्यात त्याचे पाय सोलून निघाले आहेत.
सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधिकाशक डॉ वैशाली कडूकर एसडीपीओ राहुल. धस यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुनील महाडीक पोलीक हवालदार नितीन चतुरे तात्या कदम अमोल जगदाळे हनुमंत दडस वैभव सूर्यवंशी अमोल देशमुख psi दिपक पवार पो ना अमोल पवार अमोल देशमुख यांनी केली.

पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदाने यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गाडी पकडली
सादर फरारी आरोपीचा शोध सुरू आहे व जखमी आरोपीला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!