ताज्या घडामोडी
सोनाली माणिक मुळीक यांची कार्यकारी सहाय्यक पदी निवड

(फलटण /प्रतिनिधी): सासकल गावची सुकन्या, प्रगतिशील शेतकरी श्री माणिक तुकाराम मुळीक व संगिता माणिक मुळीक यांची कन्या व माजी सरपंच मछिंद्र तुकाराम मुळीक व शांता मच्छिंद्र मुळीक यांची पुतणी तसेच बबई तुकाराम मुळीक व तुकाराम केशव मुळीक यांची नात कु.सोनाली माणिक मुळीक यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2024 साली ‘कार्यकारी सहाय्यक’ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये 10 वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.तिची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाली आहे.
-
सोनाली माणिक मुळीक हीचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून शेतीतली कामे करून, आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत तिने हे यश प्राप्त केले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथ.शाळा निरगुडी व माध्यमिक शिक्षण निरगुडी हायस्कूल निरगुडी येथे झाले आहे. तिने पदवीपर्यंतचे शिक्षण वाणिज्य शाखेत मुधोजी महाविद्यालय मधून पूर्ण केले आहे.कु.सोनाली माणिक मुळीक हिने पदवीनंतर सनदी लेखापाल यांच्या हाताखाली दोन वर्षे कामही केले आहे. कु.सोनाली माणिक मुळीक यांना तीन बहिणी असून मोठी बहीण माधुरी हीने अभियांत्रिकी क्षेत्रात, मनीषा हिने संगणक क्षेत्रात तर लहान बहीण कला शाखेत अध्यापन करत आहे.