हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

मंथन परिषदेत आंदरुडचा वेदांत गोसावी जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सहावा

 (प्रतिनिधी/ राजेंद्र भागवत)):मंथन जनरल नॉलेज एक्झामिनेशन- 2025 इयत्ता दुसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्णेवाडी ( आंदरुड ) ता. फलटण येथील विद्यार्थी वेदांत महेश गोसावी याने १५० पैकी १४० एकूण ९३ टक्के मार्क मिळवून सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर राज्यात सहावा क्रमांक मिळवून उत्तुंग यश मिळवले वेदांत यांस त्याचे शिक्षक अविनाश सुतार सर व शामराव निंबाळकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

वेदांतचे वडील फलटण एसटी आगारात वाहक पदावर कार्यरत असून आई गृहिणी आहे. लहान वयात इयत्ता दुसरीतील वेदांत गोसावी यांने मिळविलेली गुणवत्ता कौतुकाचा विषय बनला आहे. वेदांतचे आंदरुड आणि पंचक्रोशीतून कौतुक होतं आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!