हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

म्हसवड पोलिसांची अवैध दारू विक्री आणि अवैध दारू वाहतूक अनुषंगाने धडाकेबाज कामगिरी

किलोमीटर पाठलाग करून लाखो रुपये किमतीची देशी, विदेशी, ताडी, हातभट्टी वाहनासह जप्त करून आरोपींना अटक

(जावली/ अजिंक्य आढाव)म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांना आळा बसावा तसेच अवैध दारू वाहतूक व दारू विक्री बंद व्हावी या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून त्याचबरोबर संशयित इसमांचा पाठलाग करून अवैध दारू विक्री आणि दारू वाहतुकीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

मौजे हिंगणी तालुका माण गावच्या हद्दीत आरोपी नामे तातोबा लक्ष्मण सरतापे हा स्वतःच्या आर्थिक फायदे करिता ताडी व हातभट्टी दारूची निर्मिती करून विक्री करत असले बाबत माहिती मिळाल्याने त्याच्या राहत्या घराच्या आडोशाला रेड मारून त्याच्याकडून ताडी आणि हातभट्टी दारू जप्त केलेली आहे तसेच पेट्रोलिंग दरम्यान एक संशयीत इसम त्याच्या मोटरसायकल वरून दहिवडी ते म्हसवड जाणाऱ्या रोडवरून बेकायदा बिगर परवाना देशी, विदेशी दारूची वाहतूक करू  न घेऊन जात असताना त्याच्यावर संशय आल्याने त्याला थांबण्याचा इशारा करून देखील तो न थांबल्याने अधिक संशय बळावला आणि त्याचा जवळपास पाच किलोमीटर पाठलाग करून संशयित इसमास पकडल्यानंतर त्याने त्याचे नाव पोपट पांडुरंग शिंदे रा. पानवण तालुका माण जिल्हा सातारा असे सांगितले.
त्याच्याकडे असलेल्या पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये देशी दारू, विदेशी दारू भेटलेली असून जवळपास लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आणि या दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावर अटकेची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली खालील अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,अमर नारनवर मैना हांगे गेल्या सुरेश हांगे नितीन निकम संजय आस्वले अनिल वाघमोडे  नवनाथ शिरकुळे वसीम मुलानी
संतोष काळे , यांच्या सह पोलीस स्टाफसह कारवाई केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!