हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

पिंपरी – चिंचवड ग्रीव्हज समुह कामगार पतसंस्थेच्या सचांलक पदी शिवराज शिंदे यांची बिनविरोध निवड

(फलटण/सतीश कर्वे)- पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहती मधील नामांकीत ग्रीव्हज कंपनीच्या समुहाच्या कामगार पतसंस्थेच्या संचालक पदी शिवराज शिंदे यांची बिनविरोध निवड करणेत आली.

ग्रीव्हज उद्योग समुहाच्या ४ कंपनीच्या युनिटचे कामगार हितासाठी व आर्थिक उन्नतीसाठी एकञ करुन पतसंस्थेचे १४०० सभासद पतसंस्थेचे आहेत.विडणी सारख्या ग्रामीण भागातला तरुण युवक स्वताःच्या कर्तुत्वावर पिंपरी चिंचवड सारख्या महानगर पालिका स्मार्ट शहरात आपले स्थान बनवून ग्रिव्हज समुहाच्या गेली ६९ वर्षे कार्यरत असणारी सहकारी पतसंस्थेत गेली ६ वर्षे संचालक पदी तसेच सचिव म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडल्याने सभासद संचालकांच्या विश्वासास पाञ राहील्याने सन २०२५ ते २०३०या कालावधी साठी शिवराज शिंदे यांची बिनविरोध संचालक पदी निवड केल्याने विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे निंबाळकर श्रीमंत संजीवराजे निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे निंबाळकर युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे निंबाळकर श्रीमंत विश्वजितराजे निंबाळकर माजी आमदार दिपकराव चव्हाण श्रीराम कारखानाचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी अभिनंदन केले.

चौकट – गेली वीस वर्षे पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असलेले शिवराज शिंदे यांनी जन्मभुमी गावाशी नाळ तुटू न देता लोकसेवा संघ फलटणची स्थापना करुन त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत.या माध्यमातून आपल्या भागातील युवक एकञ करुन सामाजिक उपक्रम राबवित असतात,तसेच अनेकांच्या अडचणीना मदतीस कायम तत्पर असतात.

ग्रीव्हज कामगार पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झालेबद्दल सत्कार करताना श्रीमंत रामराजे निंबाळकर प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी संचालक अनिल शिंदे आदी मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!