क्रीडा व मनोरंजन
सातारा जि. प. सातारा आयोजित जिल्हास्तरीय शासकीय दिव्यांग स्पर्धेत फलटण येथील मूकबधिर विद्यालयाचे उज्वल यश
श्रीनाथ जाधव, शंभू मसुगडे, निर्मला पुणेकर यांची दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

(फलटण/ प्रतिनिधी)- सातारा जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सातारा आयोजित दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय शासकीय मैदानी क्रीडा स्पर्धा सातारा येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचे उद्घाटन सातारचे जिल्हाधिकारी मा. श्री. संतोष पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजा यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी विद्याधर चन्नावार व वै.सा.का. सौ. ललिता शेळके मॅडम इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयाच्या मुलांनी उज्वल यश प्राप्त केले आहे.
यामध्ये मूकबधिर विद्यालय ठाकूरकी ता.फलटण या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून चांगली कामगिरी केली.
या स्पर्धेत एकूण १३ विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाले. यापैकी प्रथम क्रमांक विजेते
शंभू बापू मसुगडे लांबउडी १६ ते २१ वयोगट
श्रीनाथ अनिल जाधव १०० मीटर पोहणे १६ ते २१ वयोगट
कु. निर्मला पांडुरंग पुणेकर लांबउडी वयोगट १६ ते २१
कु. निर्मला पांडुरंग पुणेकर २०० मीटर धावणे वयोगट १६ ते २१