ताज्या घडामोडी
विडणी ग्रामपंचायत उपसरपंचासह 8 सदस्य अपात्र ; सागर अभंग यांच्या पाठपुराव्याला यश
निकाला विरोधात हायकार्टात सर्व अपाञ सदस्यासह आपिल दाखल करणार असल्याचे उपसरपंच - अँड सुनिल अब्दागिरे

(जावली/अजिंक्य आढाव)फलटण तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायत विडणीमध्ये विकास कामांना नियमित विरोध करत कोणते विकास कामे होऊ न देणे व विकास झालेली मंजूर कामे अडथळ निर्माण करणे यासोबतच ग्रामविकास अधिकारी यांचे संगमत करून गावाचा विकास ठप्प करण्याचे कामकाज हे विडणी ग्रामपंचायत उपसरपंच सुनील नारायण अब्दागिरी व त्यांच्यासोबत आठ सदस्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम प्रमाणे पुणे विभागीय आयुक्त यांनी कारवाई केली आहे.
सध्या सर्वञ राजकीय परस्थिती पाहता प्रशासकीय अधिकार्या वरती राजकीय दबावाचा वापर करुन अधिकार्या वर दबाव आणून प्राप्त केलेला निकाल आहे.सदर निकाला विरोधात हायकार्टात सर्व अपाञ सदस्यासह आपिल दाखल करणार असल्याचे उपसरपंच अँड सुनिल अब्दागिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.