(फलटण/ प्रतिनिधी)- स्टेट ट्रान्सपोर्ट एम्प्लॉईज फलटण को ऑपरेटिव्ह सोसायटी लि फलटण च्या सन २०२५-२०३० या कालावधी साठी पार पडलेल्या संचालक मंडळ निवडणुकीत कामगार संघटना पुरस्कृत श्रीराम पॅनल च्या सर्व १५ जागा जिंकून तुळजाभवानी पॅनल व परिवर्तन पॅनल चा पराभव केला.
विजय उमेदवार पुढील प्रमाणे – निलेश बोधे ( ताथवडा), विलास डांगे ( भाडळी बु.), नवनाथ पन्हाळे (वाठार निंबाळकर), उमेश निंबाळकर (वाठार निंबाळकर), नितीन शिंदे ( तांबवे), राहुल जाधव ( फलटण), दादासो माने ( भाडळी बु), दत्तात्रय कोळेकर ( नांदल), महेश गोसावी ( आंदरुड), निराप्पा वाघमोडे ( खटकेवस्ती), सौ.आशा जगताप ( सुरवडी), सौ सारीका गोवेकर ( गारपीरवाडी ), सुरेश अडागळे ( जिंती), अनिल भोसले( घाडगेवाडी ),हिंदुराव करे ( कापडगाव) यांचा समावेश आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शेखर साळुंखे यांनी कामकाज पाहिले कामगार संघटनेचे नेतृत्व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या कार्यशालीवर कामगारांना भक्कम असा विश्वास दाखवून संपूर्ण पॅनेलचे उमेदवार पुर्ण बहुमताने विजयी केले. या विजयासाठी केंद्रीय उपाध्यक्ष तथा सातारा विभागीय अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सातारा विभागीय सचिव अजित पिसाळ, विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर घोणे, विभागीय संघटक सचिव सुशांत मोहिते, विभागीय खजिनदार प्रकाशराव पाटील , माजी बँक संचालक सौ लाडुताई मडके, यांनी अथक प्रयत्न केले. फलटण आगार सचिव योगेश भागवत, अध्यक्ष बाळासाहेब सोनावले, कैलास काटे, बापूराव कोडवलकर,निराप्पा वाघमोडे, निलेश बोधे, सुरेश अडागळे, देवीदास निंबाळकर, गणेश सावंत सर्व सभासदांनी निवडणूक पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली.विजयी उमेदवारांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.