हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

पाणवन ता.माण येथे जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

(जावली/अजिंक्य आढाव) माण तालुक्यातील पानवण येथे झालेल्या जातीवाचक शिवीगाळ व मारहाण घटनेप्रकरणी म्हसवड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
या बाबत गुन्हा.र.नं ६८/२०२५ अन्वये अनुसूचित जाती – जमाती प्रतिबंधक कायदा ( अ.जा.ज.का )व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की दि.14 रोजी सायंकाळी 07.00 वा. ते सायंकाळी 07.45 वा. चे दरम्यान मौजे जांभुळणी ता.माण जि.सातारा गावचे हद्दीत भोजलिंग ढाबा येथे मी व माझे मित्र राहुल तुपे, राहुल नरळे,व महावीर शिंदे असे जेवणाकरीता गेलो असता आमचे ओळखीचे विजय छबु चव्हाण, अनिल लक्ष्मण चव्हाण, व त्यांचे इतर अनोळखी साथीदार यांनी आपआपसात संगनमत करुन विजय चव्हाण, व राहुल तुपे यांचेत झालेल्या किरकोळ कारणांचे भांडणावरुन, मी व राहुल तुपे असे आम्ही दोघे मांग समाजाचे आहे हे माहीत असुन सुध्दा आम्हांला उद्देशुन ‘ये मांगट्यानो मघाशी, लय बोलत होता ना, भैनचोदांना मारा’ असे म्हणून कुऱ्हाडीने, लाकडी काठीने, व लाथाबुक्क्याने मारहाण करुन राहुल राजु तुपे यांचे डोक्याला व पायाला गंभीर दुखापत तसेच व माझ्या उजव्या पायाला गंभीर दुखापत,डाव्या हाताला व पाठीला दुखापत झाली असून फिर्यादीच्या उजव्या पायासह पाठीला आणि डाव्या हाताला मार लागला आहे.

दि.१५मार्च रोजी रात्री ४:५४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासकामी दि.१६ रोजी आरोपींना अटक करण्यात आली आहे.त्यांना वडुज न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.या गुन्हयाचे स्वरूप गंभीर असून तातडीने आरोपींना अटक करुन केले आहे.पुढील तपास सुरू आहेत .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!