(जावली/ अजिंक्य आढाव)-म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील माणगंगा नदीपात्रात एक लाल रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली मध्ये वाळू भरून चोरटी वाहतूक करीत असले बाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीला पकडण्याकरिता म्हसवड, शिरताव पूळकोटी अशा बाजूने जात असताना शिरताव ते पूळकोटी जाणाऱ्या रोडवर बनगरवाडी गावचे पूलाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर, ट्रॉली सह रोडवर दिसल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली.
त्यामुळे या अनुषंगाने म्हसवड पोलीस ठाण्यात सुरज महादेव गोरवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर, ट्रॉली, वाळू असा 7 लाख 33 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणारे यांचे धाबे दणाणले आहेत.सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
म्हसवड पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे , पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, सतीश जाधव, अनिल वाघमोडे, संतोष काळे, योगेश सूर्यवंशी,भास्कर गोडसे, राहुल थोरात, विनोद सपकाळ या कारवाईत सहभागी झाले होते.