हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

म्हसवड पोलिसांचा अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका ; दारू, जुगार अड्डायांवर छापा १२ आरोपींना अटक

अ‌क्षय सोनवणे यांच्या कारवाईने अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले

(जावली/ अजिंक्य आढाव)-म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी कठोर पाऊल उचलले आहे. या अनुषंगाने म्हसवड हद्दीतील हिंगणी राजेवाडी रोड जवळ असणाऱ्या दर्शन किराणा दुकानाच्याआडोशाला मटका घेणाऱ्या, विरळी येथे मटका घेणाऱ्या, विरळी येथे जुगार पत्ते खेळणाऱ्यांना, त्याचबरोबर मासाळवाडी हद्दीतील मोदी धाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या, तसेच जय मल्हार धाब्याच्या आडोशाला दारू विकणाऱ्या, ढाकणी येथे दारू विकणाऱ्या, तब्बल 12 आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आलेली आहे.

मटका घेणारे व त्यांचे मालक आरोपी

काकासो आगतराव जाधव,बाळासाहेब रामचंद्र पानसांडे,कल्याण आण्णा ओहाळ,प्रियंका रामचंद्र भंडारे

जुगार पत्ते खेळणारे आरोपी 

बबन उमाजी काळेल बापू विठोबा वाघमारे ,उद्धव सिताराम यादव,भानुदास तुळशीराम काळेल,बाबा बबन धुमाळ

दारू विक्री करणारे आरोपी

नवनाथ महादेव मासाळ,संजय सुखदेव कोडलकर,तातोबा गोजाबा कांबळे

वरील सर्व आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यापुढे देखील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा चालूच राहणार आहे.सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे,पोलीस अंमलदार देवानंद खाडे,भगवान सजगणे,शशिकांत खाडे,रूपाली फडतरे,निता पळे,मैना हांगे,अमर नारनवर,सुरेश हांगे,जगन्नाथ लुबाळ,नवनाथ शिरकुळे,अभिजीत भादुले,विकास ओंबासे,अनिल वाघमोडे,युवराज खाडे, राहुल थोरात यासह कारवाई मधे सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!