हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

डॉ.विठ्ठल बापुजी ठोंबरे व्दितीय स्मृती दिना निमित्ताने दुधेबावी येथे ग्रामीण साहित्य संमेलनाचे ; लोक साहित्याच्या चळवळीतील अस्सल कोहिनूर हिरा खंडोबाने झपाटलेला विठोबा हा खरा साहित्याचा अलंकार आहे – डॉ मुरहरी केळे

(गोखळी /प्रतिनिधी): (राजेंद्र भागवत)लोकसाहित्याच्या चळवळीतील अस्सल कोहिनूर हिरा” खंडोबाने झपाटलेला विठोबा” हा खरा मराठी साहित्याचा अलंकार आहे. असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी केळे यांनी केले ते दुधेबावी (ता. फलटण) येथे डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये बोलत होते.

     डॉ. केळे पुढे म्हणाले, कुलदैवत खंडोबाचे संशोधन करून नव्या पिढीसमोर एक संशोधक दृष्टी निर्माण करणारा साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती होती. समाजातील वंचित लोककलावंतांना त्यांच्या नावे पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येणार आहे असे संमेलनाध्यक्ष डॉ. मुरहरी केळे यांनी जाहीर केले.

       पुढे स्वागतध्यक्ष ग्रामीण कथाकार प्रा रवींद्र कोकरे यांनी लोकसाहित्य हाच खरा साहित्याचा आत्मा असून दरवर्षी उपेक्षीत वंचित पण लोककलेची सेवा करणाऱ्या लोककलावंताचा सन्मान करणे हा संमेलनाचा उद्देश आहे.उद्घाटक बा. ग. केसकर यांनी भटक्या विमुक्त समाजातील तरुणांनी शिक्षण घेऊन साहित्य सेवा करावी असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी येथील वृक्षमित्र सचिन सोनवलकर यांना वनश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ह. भ. प. नवनाथ महाराज कोलवडकर (दालवडी) यांचे फुलाचे कीर्तन दहा ते बारा या वेळेत झाले.

    दुपारच्या सत्रामध्ये कवि संमेलन हनुमंत चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली विक्रम गायकवाड, प्रमोद जगताप, प्रा. मुकुंद वलेकर, अविनाश चव्हाण, प्रकाश सकुंडे, युवराज खलाटे, शुभांगी सोनवलकर, आशाताई दळवी, मनीषा मिसाळ, राहुल निकम, महोसीन आतार, ज. तु. गार्डी, बाबा लोंढे, सागर कराडे, आकाश आढाव, प्रतीक्षा आढाव, विद्या शेळके हे कवी सहभागी झाले होते.

  त्यानंतर परिसंवाद लोकसाहित्याचे योगदान या विषयावर प्रवीण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली वक्ते एम. डी. दडस, आम्रपाली कोकरे, प्रा राजेंद्र आगवणे, गोपाळ सरक या साहित्यिकांनी आपली मते मांडली.

       या ग्रामीण साहित्य संमेलनास मारुतराव वाघमोडे, राजेंद्र बरकडे, दिनकरराव सोनवलकर, शंकर शिंगाडे, कुमार देवकाते, जयवंत तांबे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, अनिल कोकरे, सुभाष बोंद्रे, आकाश मुंडे, दिलीप कोकरे, सोमनाथ लोखंडे, पिंटू ठोंबरे, बापूराव झंजे, विकास सोनवलकर, प्रकाश सस्ते , विठ्ठल पडर व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सोनवलकर व आभार प्रदर्शन सचिन लोखंडे यांनी केले तर स्वागताध्यक्ष प्रा रवींद्र कोकरे व मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!