(फलटण/ प्रतिनिधी- सतीश कर्वे) मंगळवेढा कुर्ला बसने पेट घेतला विडणी गावाजवळच गाडीत धुराचा लोट शिरल्याने गाडी बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची दमछाक झाली.दोन तीन प्रवाशी किरकोळ जखमी झाले.गाडीची काच फोडून प्रवाशी बाहेर पडले.विडणीतील लोकांनी बसच्या इंजिनवर केबिन मध्ये पाणी मारुन आग आटोक्यात आली.यामुळे मोठा अनर्थ टळला बस मधील जवळ पास पन्नास प्रवाशांचा जीव वाचविण्यात विडणीकर ग्रामस्थ देवदुत ठरले.
घटनास्थळा वरुन मिळालेली माहीती अशी की आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढाहून फलटण कडे निघालेल्या एस.टी.बस क्रं.MH 40 Y 5966 या बसने दुपारी १२ वा.सुमारास विडणी गावाजवळ पेट घेतला असता पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने गाडी थांबवून निर्देशनास आणली.बस चालक लहू उरकुडा मडावी याने गाडी थांबवताच गाडीत धुराचा लोट शिरला.बस प्रवाशाने गच्च भरली होती.यामुळे गाडीत एकच गोधळ उडाला आरडा ओरड झाली धुरामुळे प्रवाशांची दमछाक झाली.गाडीतून बाहेर पडण्याच्या दरवाजा जवळील इंजीन मधुन आग धुर बाहेर आल्याने प्रवाशांना गाडी बाहेर पडता येत नव्हते.
विडणीतील ग्रामस्थांनी बसकडे धाव घेऊन बसच्या मागच्या बाजूची काच फोडून प्रवाशांना बाहेर काढले.बसमध्ये केबीन इंजीन मध्ये पाणी मारुन आग आटोक्यात आणल्याने मोठी जिवितहानी वाचून मोठा अनर्थ टाळण्यात विडणीकर ग्रामस्थ देवदूत बनून आल्याने विडणीकरांचे कौतुक होत आहे