हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ; अपहरण गुन्ह्यातील आरोपीनां शिताफीने पकडले

अल्पवयीन मुलींच्या अपहरण अनुषंगाने दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांतील आरोपी पंढरपूर आणि कराड येथून म्हसवड पोलीसांच्या ताब्यात

(जावली/अजिंक्य आढाव) फलटण, दहिवडी धडाकेबाज कामगिरी नंतर नवनियुक्त सिंघम पोलिस  अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या कडून पारदर्शक व गतिमान कामगिरी पाहिला मिळाली.म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मोटेवाडी वरकुटे म्हसवड आणि वडजल या दोन ठिकाणावरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून तक्रारदार यांच्या कायदेशीर राखवलीतून फूस लावून पळवून घेऊन गेले बाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे म्हसवड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिला व मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने बेस्ट डिटेक्शन

या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने व प्रकरणाचे गांभीर्य बघून नवनियुक्त प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे फिरवली.
तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती याद्वारे या दोन्ही गुन्ह्यातील अपहरित मुली आणि त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शीताफिने शोधून पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा.वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे ,महिला पो. हवालदार मैना हांगे पो. नाईक अमर नारनवर पो.कॉ.नवनाथ शिरकुळे ,पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे या म्हसवड पोलीस ठाण्यात सहकाऱ्यांनी कारवाई मधे सहभागी झाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!