(फलटण/प्रतिनिधी )- फलटण शहर आणि तालुक्यातील लोकांमध्ये सहकार संस्थांच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या चर्चा जोरात आहेत. सहकार कायद्यातील कलम 101 नुसार पतसंस्थांना थकीत कर्जदारांच्या मालमत्तेची जप्ती करण्याचा अधिकार आहे, मात्र याचाच फायदा घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जदारांची मालमत्ता हिसकावण्याचे प्रकार घडत आहेत. सहाय्यक निबंधक ऑफिस आणि संस्था चालकांमधील आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आरोप आहे. यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक आणि मानसिक ताण पडला आहे आणि काही व्यक्तींनी भीतीमुळे हर्ट अटॅक झाल्याच्या चर्चा आहेत.
सहकार संस्थांच्या चालकांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुठल्यातरी अदृश शक्तीचा वरदहस्त मिळत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या प्रकरणात ED, CBI, आणि आयकर विभागाकडून चौकशी होण्याची मागणी होत आहे. पिडीतांना न्याय मिळण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 2015 नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्याच्या चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागल्या आहेत