हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

सिंघम पोलिस अधिकारी अक्षय सोनवणे यांची म्हसवड पोलीस ठाण्यात बदली

(जावली/अजिंक्य आढाव)- दहिवडी पोलीस निरीक्षक म्हणून लाभलेले, संवेदनशील कार्यतत्पर, समाजाभिमुख चेहरा म्हणजेच अक्षय सोनवणे साहेब. नित्याच्या कर्तव्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या पोलीस अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यात सिंघम पोलिस अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली.

पोलीस खात्यातील सिंघम तसेच जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याच्या माध्यमातून पुरस्कार मिळवणारे गोरगरीब लोकांचे पोलीस वर्दीतील दैवत श्री .अक्षय सोनवणे साहेब दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  गरीब लोकांना न्याय देण्या साठी ज्यांचा जन्म झाला आणि लोकांना न्याय देण्यासाठी आंगावर खादी चडवली जसे पोलीस यांचे ब्रीद वाक्य तसेच त्यांच्या कामात तत्परतेने झटणारे ना दिवस ना रात्र फक्त नी फक्त नागरिकांसाठी सडे तोड निर्भिड जनतेला न्याय देण्यासाठी या फलटण तालुक्यातून जाऊन माणदेशी मध्ये सर्वात जास्त पोलीस खात्यात नाव पुरस्कार घेणारे पोलीस खात्यातील दहिवडी सम्राट म्हणजे आदरणीय अक्षय सोनवणे साहेब हे आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही गोष्ट असो कर्तव्या पलीकडे जाऊन त्यांनी केलेले काम आणि जनतेची सेवा आपण पाहिले आहे. पोलीस प्रशासनाची ख्याती मोठी असुन ही ख्याती मिळवण्यासाठी अक्षय सोनवणे यांनी अविरत परिश्रम, जीवाची बाजी लावून काम करणयाची प्रवृत्ती, कर्तव्यापलिकडे जाऊन केलेली जनसेवा या गोष्टी कारणीभूत आहेत. अडल्या-नडल्यांना गोरगरीब माणसांना समजावून सांगत प्रत्येक समस्या सोडवण्याचे काम त्यांनी केलेलं आहे सर्वांशी आपलेपणाने वागून, शांत स्वभावानं सर्वांशी आपुलकीने व आपलेपणाने वागणारे अधिकारी होय.

सर्वसामान्य माणसाला योग्य तो न्याय मिळवून देण्याचा उल्लेखनीय काम त्यांच्या हातून झालंय आहे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात खाकीतील खमक्या अधिकारी लाभला हे एक दहिवडी माणच भाग्यच म्हणावे लागेल. अक्षय सोनवणे साहेब यांची शिस्त जरी कडक असली तरी मन मात्र निखळ मनासारखं गोड आहे म्हणून त्यांच्या कामगिरीचा चढता आलेख हा भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करतो आणि फलटण , दहिवडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात काम सुरू झाल्यापासून अनेक गुन्ह्यांचा उकल करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. अक्षय सोनवणे साहेब यांचा आदर्श सर्व नवतरुणांनी घेतला पाहिजे. पोलिस दलात काम करत कर्तव्यापलीकडे जाऊन भरीव योगदान ते नेहमी देतात.यातून दहिवडी येथील नागरिकांचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास वाढला असून यातुन. आपल्यावरील विश्वास एक अतूट नातं बनलं आहे परंतु काही ठिकाणी आपण आपला खाक्या दाखवलाच पाहिजे हे मात्र निश्चित खरं आहे. पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब यांंची दहिवडी पोलिस ठाण्यात सतत नंबर एकचे पोलिस ठाणे म्हणून गुण गौरव मिळवला सातारा जिल्हात नंबर वन चे पोलिस स्टेशन असा डंका वाजवला मात्र आता म्हसवड पोलीस ठाण्यात बदली झाली असून ते आज पासून कार्यरत झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!