आपला जिल्हा
राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज जावली येथे मातृ पितृ पाय पूजन सोहळा उत्साहात साजरा

(जावली/ अजिंक्य आढाव)फेब्रुवारी महिन्यातील वॅलेंटाइन डे’च्या दिवशी सर्वत्र प्रेमाचा उत्सव साजरा होत असतानाच आई-वडील हेच खरे आपले गुरू, त्यांच्यावर प्रेम करा असे सांगत प्रा.अमोल चवरे यांनी मत व्यक्त केले.मातृ-पितृ दिन राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली येथे साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतच आई-वडिलांचे औक्षण करीत त्यांचे पूजन करीत आशीर्वाद घेतले व खऱ्या अर्थाने हा दिवस आपल्या प्रेमांच्या माणसांसह साजरा केला.
जावली,मिरढे ,बरड ,कुरवली, राजुरी आदंरूड पश्चिमेच्या रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही गर्दी झाली होती. लहान गट ते बारावी पर्यंत सर्व मुलांच्या पालकांना शाळेत बोलावण्यात आले होते.प्रत्येकाच्या आयुष्यात आई-वडिलांचे स्थान सर्वात महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या मनावर आई-वडिलांचे प्रेम अधिक बिंबवले जावे म्हणून मातृ-पितृ दिन भव्य व दिव्य प्रमाणात साजरा केला. वात्सल्य, कुटुंबातील व्यक्तींसाठी त्यागाची भावना, आपुलकी, जिव्हाळा म्हणजेच खऱ्या अर्थाने आयुष्यभर प्रेमाचे नाते जपणार्या आई-वडिलांची पूजा करा, आई-वडिल यांच्यावर खरे प्रेम केले पाहिजे, जो आई-वडिलांची सेवा करतो तो यशस्वी होतो असे सांगत या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मातृ-पितृ पूजन सोहळ्यात सामील करून घेण्यात आले. मुलांनी शाळेत आलेल्या आपल्या आई-वडिलांना कुंकू लाऊन त्यांचे औक्षण केले. त्यांची पूजा करून आशीर्वाद घेतले. दोन तास हा विद्यार्थी व पालकांचा सोहळा रंगला होता.
निर्भय पथकाच्या प्रमुख अनिता पानसरे, संध्या वलेकर मातृ पितृपायी पूजन सोहळा दरम्यान रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली च्या कार्यक्रमात बोलत होत्या संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया हत्याकांडानंतर देशपातळीवर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. देशाच्या अनेक राज्यात महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणं सुरु झालं होतं. महाराष्ट्रात सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने नेमन्यात आलेल्या महत्वाच्या पथकांपैकी एक म्हणजे निर्भया पथक मागच्याच वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने निर्भया पथकाचं उद्घाटन करण्यात आलं. या निर्भया पथकाचं काम कसं असेल त्याची रचना कशी असेल या सगळ्या संदर्भातली माहिती सांगितली व आजच्या काळातील महिलांमध्ये सुरक्षित कशाप्रकारे बाळगावी या बद्दल माहिती दिली.
