हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

१०० हुन अधिक रेकॉर्डवरील गुन्हे दाखल असलेला आरोपी जावली येथे पाठलाग करुन पकडला

फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

(जावली/ अजिंक्य आढाव )फलटण तालुक्यातील गुन्ह्यात वाढ झाली आणि त्याच प्रतिबंध करणे कामे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी प्रभावीपणे ग्रस्त घालण्याची म्हणून सुरू केली आहे .

दि. 19 /2 /2025 रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे कडील पथक जावली परिसरात रात्रगस्त करीत असताना फलटण कडून शिंगणापूरच्या दिशेने निघालेले एका मोटरसायकल स्वराची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास थांबवण्याचा इशारा केला असता त्याने भरधाव वेगाने गाडी शिंगणापूरच्या दिशेने नेहली या प्रकरणामुळे तो इसम संशयास्पद असल्याची खात्री झाल्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला शिंगणापूर घाटातील एका वळणावर पोलिसांनी त्यास गाठून त्या ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारतात त्याने आपले नाव युवराज अकोबा निकम 55 राहणार पिंपळे बुद्रुक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा असे असलेले सांगितले यावरून पोलीस अभिलेख पडताळून पाहता त्याचे विरुद्ध वाहन चोरींचे शंभरून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समजून आले यावरून त्याचे ताब्यात मिळून आलेली होंडा शाईन मोटरसायकल एम एच 11 सीसी 34 85 सुद्धा चोरीची असलेली शक्यता दिसून त्यामुळे त्याबाबत सखोल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल सातारा पोलीस ठाणे हद्दीत चोरीत गेलेली समजून आले सदर घटनेच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्ट्रेशन 1/53 /2025 महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 122 त्याचा पुढील तपास पुढे निरीक्षक मठपती करीत आहेत सदर कामगिरी मा. समीर शेख पोलीस अधीक्षक माननीय वैशाली कडूकर  पोलीस अधीक्षक राहुल दस सौ पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनानुसार पोलीस निरीक्षक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक जीबी मदने पोलीस हवालदार वैभव सूर्यवंशी पोलीस हवालदार नितीन चतुरे पोलीस नाईक अमोल जगदाळे श्रीनाथ कदम तुषार अडके पोलीस श्रीकांत खरात यांनी या कारवाई मध्ये भाग घेतला होता सदर आरोपी हा अटक असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!