(जावली/अजिंक्य आढाव) -महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती आज राज्यासह जगभरात साजरी करण्यात आली या वेळी शिवरत्न तरुण मंडळ जावली ता.फलटण यांच्या वतीने विविध उपक्रम राबवत शिवाजी महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली.यावेळी वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान शिबीर, पोवाडा सादरीकरण करण्यात आली.
शिवरत्न तरुण मंडळ जावली यांच्यावतीने शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमधील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे शिवरत्न तरुण मंडळ व ग्रामस्थ जावली यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
मोठा गट
प्रथम – श्रद्धा अशोक शेवते:- 7वी
द्वितीय- अहिल्या राजेंद्र गोफणे- 7वी
तृतीय – अनुष्का धनशिंग मोरे 7 वी
लहान गट
1)प्रथम – राजनंदिनी विठ्ठल पडर – 3 री
2)द्वितीय- कृष्णाली सचिन पडर – 4थी
3)तृतीय -शुभ्रा सागर बाबर- 4 थी
रक्तदान शिबीर आयोजित करण्यात होते , रक्तदान शिबीर मधे 27 रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता.तर जयंती दिवशी भव्य मिरवणूक गावातुन काढण्यात आली होती.
शिवजयंती निमित्ताने तरुणांनी रायगडावरुन शिवजोत आणण्यात आली.या वेळी शिवरत्न तरुण मंडळ कार्यकत्या आदित्य किर्दत (20 किलोमीटर अंतरापर्यंत शिवसदेंश देणारी ज्योत आणली)
जयंतीच्या कार्यक्रमात दिवशी मंडळाच्या वतीने शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून गुणवंतांचा गुणगौरव व कार्यक्रमासाठी जावलीतील राजकीय शैक्षणिक सामाजिक व बँकिंग तसेच शेती व महसूल विभागातील पदाधिकारी ग्रामस्थ व तरुण मंडळ उपस्थित होते.