हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

शिवशंकर माध्य.विद्यालयाच्या इ.10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

(जावली /अजिंक्य आढाव): मौजे सासकल येथील शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विनायक नारायण मदने यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना असे म्हटले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उज्वल यश संपादन करावे व आपल्या शाळेचे व आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उज्वल करावे. आपल्या शिवशंकर माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता मागील काही वर्षांपासून अतिशय उज्वल राहिले आहे तीच परंपरा कायम ठेवण्याचे आव्हान तुम्हा सर्व विद्यार्थ्यांवर आहे. शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीला प्रत्यक्ष फळ आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तेव्हा सर्वांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून उज्वल यश संपादन करावे असे विद्यार्थ्यांना संबोधित करताना विनायक मध्ये म्हणाले.

या कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य श्रीमंतराव धोंडिबा घोरपडे, प्राचार्य तथा पंचायत समितीची माजी सदस्य सुभाषराव महादेव सोनवलकर यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षा काळामध्ये अभ्यासाचे तंत्र कशा पद्धतीने वापरावे व कोणत्याही विषयाचा पेपर हा पूर्ण करण्यावर विशेष भर द्यावा. तसेच पेपर लिहिताना कोणती काळजी घ्यावी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी अनमोल किराणा स्टोअर चे प्रोप्रायटर विठ्ठल मुळीक,पैलवान मा. उपसरपंच दत्तात्रय दळवी, अंगणवाडीच्या मदतनीस दीपाली पवार, अंगणवाडी सेविका पुष्पाताई मुळीक, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय प्रभू कर्णे, शिक्षक चंद्रकांत शिवाजी सुतार सर, अरुण झगडे सर,वैशाली रमेश सस्ते मॅडम, गोडसे मॅडम, बाळू ल.सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्याक जालिंदर बल्लाळसर व विद्यार्थी उपस्थित होते.

गावच्या सरपंच उषाताई राजेंद्र फुले व उपसरपंच सोनाली मंगेश मदने,जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख श्रीम. शारदा देवी सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम, श्री.सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांनी ही दूरध्वनीमार्फत विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!