(जावली/अजिंक्य आढाव)- “बेटी बचाओ बेटी पढाओ” या योजनेला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शासनाकडून आलेल्या आदेशाप्रमाणे दहिवडी पोलीस ठाणे हद्दीत दहिवडी पोलीस ठाण्याचे महिला पोलिस अंमलदार, पोलीस भरती अकॅडमीच्या विद्यार्थिनी, त्याचबरोबर शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांच्यासह जनजागृती पर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीमध्ये सर्व महिलांनी स्फुर्तपणे सहभाग घेतला. त्याचबरोबर फ्लेक्स , बॅनर याद्वारे बेटी बचाओ बेटी पढाओ या अनुषंगाने चांगले उपदेशात्मक संदेश दिले.
सदरची कार्यवाही ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी महिला पोलीस अंमलदार यांचेसह केलेली आहे.