गोखळी (प्रतिनिधी):एकदंताय सामाजिक विकास संस्था खटकेवस्ती च्या वतीने दरवर्षी प्रमाणे गणेश जयंती निमित्त यंदाही अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे मार्गदर्शक जेष्ठ नेते सुखदेव खटके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
एकदंताय सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून गणेश गणेश जयंती निमित्त सालाबादप्रमाणे रक्तदान शिबीर, गुणवंत विद्यार्थी सन्मान, अन्नदान, वृक्षारोपण आदी कार्यक्रम आयोजित करतात. व वर्षभर केलेले सामाजिक कामे ऐकून समाधान वाटले. अशे उपक्रम कौतुकास्पद आहेत.असे ह भ प रामदास कदम महाराज यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखा कला व रंगकाम (एलिमेंटरी) प्रमाणपत्र परीक्षेत हनुमान माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गोखळी येथील परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या कु.भक्ती दिनेश मचाले कु.समृद्धी सचिन धुमाळ कु.तेजल लालसिंग डुबल कु.स्नेहल दत्तात्रय गावडे. कु.सानिका दत्तात्रय ढोबळे कु.समृद्धी दत्तात्रय वनारसे.कुमार.ओम सचिन थोरात. मॅग आणि माऊली फाउंडेशन संचलित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर अंतर्गत जनसेवा वाचनालय अंतर्गत तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ह भ प आदित्य रामदास कदम. तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक.अथर्व संजय खटके. द्वितीय क्रमांक.प्रतीक सुयश करे. मुलीमध्ये प्रथम क्रमांक.श्रेया महादेव वळकुंदे . लहान गट तृतीय क्रमांक.श्रावणी गणपत वळकुंदे.*
वकृत्व स्पर्धा तनवी अक्षय खटके. व गणपत दत्तात्रय गायकवाड.निबंध स्पर्धा समर्थ वैभव खटके. चित्रकला स्पर्धा स्वरा राधेश्याम मदने. हस्ताक्षर स्पर्धा तुषार राजेंद्र पवार.
एकदंताय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने किल्ला स्पर्धेमध्ये क्रमांक आलेल्या. समर्थ ज्ञानदेव शिपकुले. आदित्य रामदास कदम. शिवराज चव्हाण. अथर्व खटके.शुभम आटोळे. यश सोनवलकर.स्वरूप घाडगे. यशराज घाडगे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले व ह भ प आदित्य रामदास कदम यांच्या सुंदर वाणी मध्ये श्री ची आरती करण्यात आली.
एकदंताय सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सागर चव्हाण. सचिव सुनील चव्हाण. उपाध्यक्ष आकाश घाडगे. खजिनदार विकास गायकवाड व पदाधिकारी यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी राधेश्याम जाधव यांनी संस्थेच्या वतीने मागील वर्षी राबवण्यात आलेल्या सर्व उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बजरंग खटके. सुखदेव खटके. माजी फौजी पोपट भोसले. ह भ प रामदास महाराज. राजेंद्र गावडे पाटील. अक्षय खटके संतोष राऊत यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संतोष पंढरीनाथ खटके.संजय भाऊ गावडे. अक्षय गावडे. पोलीस पाटील राजेंद्र धुमाळ.सुभाष खटके. भीमराव खटके. तानाजी घाडगे. हनुमंत गायकवाड. खटकेवस्ती येथील नागरिक.महिला व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राधेश्याम जाधव यांनी सूत्रसंचालन केले व विकास गायकवाड यांनी आभार मानले.