आपला जिल्हा
श्री.गणेश फेस्टिव्हल तिरकवाडी बैलगाडा शर्यती संपन्न : श्री संत बाळूमामा प्रसन्न ओमकार भैय्या येळे, तिरकवाडी ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

(जावली /अजिंक्य आढाव)जय गणेश फेस्टीव्हल क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गेली २७ वर्षे सलगपणे श्री गणेश फेस्टिव्हलचे यशस्वी आयोजन व त्यामाध्यमातून वृध्द, महिला, तरुण वर्ग, विद्यार्थी वगैरे सर्व समाज घटकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करुन सर्व समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम अखंडित सुरु असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रमस्थांचे कौतुक केले, त्यांना शुभेच्छा दिल्या.
