(जावली/ अजिंक्य आढाव)फलटण तालुक्यातील जावली गाव राजकीय संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते.यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), राष्ट्रीय समाज पक्ष,भाजप, ग्रामविकास आघाडी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राजकीय पक्ष कार्यरत आहेत, ९ महिने बाकी असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चीबाधणी सुरु झाली असून गावातील तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेत येणाऱ्या निवडणुकीत वेगळेच समीकरण दिसेल असं बोललं जातं आहे.
तसेच गावाच्या सुधारणेचा ध्यास घेऊनच आजही अनेक तरुण गावकीच्या राजकारणात उतरू पाहात आहेत. अर्थात सर्वजण गणेश मकर यांच्याप्रमाणे सामाजिक कार्याचा ध्यास घेऊन ; पण त्यांना निवडणूक आणि नेतेगिरीचे आकर्षण वाढले हे मात्र नक्की या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस जावली शाखेचे अध्यक्ष पदी कामकाज पाहिले असुन वार्ड क्रं १ मधुन संधी मिळाल्यास थेट सरपंच पदासाठी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या जावली ग्रामपंचायत वर राजे गटाची ६ तर राष्ट्रीय समाज पक्षाचे ३ सदस्य कामकाज पाहत आहेत,या मधे तरुण वर्गाला न संधी मिळाल्याने स्वतंत्र भुमिका स्पष्ट करत वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यास ठाम मत परिश्रम न्युज चॅनेल शी बोलताना सांगितले.
गावातील पाणी प्रश्न, अंतर्गत रस्ते, रोड लाईट, निवासी डॉक्टर , शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण , सिद्धनाथ महाराज ,व लिंबराज मंदिर भाविक भक्तांचे प्रश्न सोडवणार , तसेच गावातील स्वच्छतेसाठी अनोखा उपक्रम राबवणार असल्याचे गणेश मकर यांनी शब्द दिला.
या बाबतीत सविस्तर बैठक घेऊन गावातील तरुणांनी एकत्र येऊन सहभागी व्हावे असे मत गणेश मकर , फैय्याज शेख, सुयोग मोरे, नितीन गोफणे, सुनिल बुधावले यांच्याबरोबरच शेकडो तरुण या मध्ये सहभागी होणार आहेत असे मत व्यक्त केले आहे.