(विडणी /प्रतिनिधी)विडणी २५ फाटा येथे अज्ञात महिलेचा मृतदेह अंधश्रध्देतून हत्या झाल्याचे प्रकार समोर येऊन घटनेला पाच दिवस झाले तरीही संबधित महिलेची ओळख व मृतदेहाची अवयव शोध लागत नाही.
विडणी २५ फाटा येथे अज्ञात महिलेचा मृतदेह अघोरी अंधश्रध्देचा प्रकार असल्याचे आढळून आल्याने ऊसाचे पंधरा एकरातील क्षेत्र ऊस तोडून मोकळे करणेत आले घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी वरिष्ठ अधिकारीसह वेगवेगळ पथक तपास कामी पाठवले असून त्यांच्या हाती ठोस धागेदोरे लागत नसल्याने या घटनेच्या खुनाचा उलगडा कशा प्रकारे लावणार याचे पोलिसां पुढे आव्हान बनले आहे.
गेली तीन चार दिवस पोलीस अधिक्षक समीर शेख पोलिस उपअधिक्षक राहुल धस पोलिस निरिक्षक सुनील महाडीक घटनास्थळी थांबून नेमलेल्या पथका कडून परिसरातून काही माहीती मिळतेय का याचा पाठपुरावा घेत होते.माञ अद्याप ही तपास कार्य चालू असून आरोपी अन महिलेची ओळख पटविणे पोलिसांना आव्हान बनले आहे.