क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानराजकीय
धोम बलकवडी कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी ; विहिरी, तलाव कोरडेपडु लागले

(जावली/अजिंक्य आढाव)- फलटण तालुक्याला वरदान ठरलेल्या धोम बलकवडी कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.
फलटण आणि माण तालुक्याला जोडलेल्या डोंगर पायथ्या लगत धोम बलकवडी कालवा गेला असून सध्या या भागातील ओढे ,तलाव यांचे पाणी आटु लागले आहे.तसेच भिजावु क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने विहीरीना पाणी कमी पडू लागले आहे.परिणामी पाणी सोडण्याची मागणी केली जाते आहे
जानेवारी महिन्यात कांदा लागवड, मका, ज्वारी, ऊस, फळबागा तसेच भेंडी गवार या पिकांना पाणी देण्यासाठी विहीरी पाणी पातळी कमी होवू लागले आहे.अशातच पिकं जोमात आहेत. या करात धोम बलकवडी चे पाणी सोडण्याची मागणी होत आहे.