महाराष्ट्र
सन 2024 मधील सातारा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशन ; दहिवडी पोलिस स्टेशन
सपोनि अक्षय सोनवणे आणि सहकाऱ्यांना सन 2024 मधील तब्बल 62 पुरस्कार प्राप्त आणि डिसेंबर 2024 मध्ये 7 पुरस्कारांनी सन्मानित

(जावली/अजिंक्य आढाव) पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्याचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी पोलिसांनी नागरिकांकरिता जी कामे करणे अपेक्षित आहे आणि ते काम करताना पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रेरणा मिळावी किंवा कामाचे कौतुक व्हावे याकरिता त्या त्या कामाप्रमाणे पुरस्कार देण्याचे आयोजित केलेले होते. यामध्ये महिला व मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने महिला पथदर्शी प्रकल्प म्हणजेच पोलीस काका दिली हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमा अनुषंगाने पोलीस ठाण्यातील महिला आणि पुरुष अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा, महाविद्यालय, अकॅडमी येथे जाऊन मुला मुलींना गुड टच बॅड टच, पोक्सो कायद्याचे मार्गदर्शन त्याचबरोबर अटीतटीच्या प्रसंगी डायल 112 ला फोन करणे, स्वसंरक्षण कार्यशाळा अशा पद्धतीचे मार्गदर्शन करत होते. त्याचबरोबर गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल हा पुढील सुनावणी कामी माननीय न्यायालयात जमा करणे त्याचा पाठपुरावा करणे या अनुषंगाने मुद्देमाल निर्गती पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त मुद्देमाल निर्मिती करण्यात आला होता. तसेच माननीय न्यायालयात हजर न राहणारे आरोपी, साक्षीदार यांच्यामुळे कोर्ट केसेसचा निकाल लागण्यास उशीर होत असल्याने नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार आयोजित केला होता या अनुषंगाने 100 पेक्षा जास्त आरोपींना अटक करून माननीय न्यायालयात हजर केले होते आणि गंभीर गुन्ह्यांमधील केसेसमध्ये फिर्यादी, साक्षीदार हे फितूर होऊ नये व आरोपींना शिक्षा लागून फिर्यादीला न्याय मिळावा या उद्देशाने सर्वोत्कृष्ट दोषसिद्धी पुरस्कार देखील आयोजित केलेला होता. या अनुषंगाने कोर्ट मध्ये साक्ष दरम्यान साक्षीदार, पंच यांना मार्गदर्शन करण्यात येत होते. दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी सन 2024 मध्ये तब्बल 62 पुरस्कार मिळवले असून डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या क्राईम मीटिंगमध्ये डिसेंबर महिन्यातील खालील प्रमाणे पुरस्कार प्राप्त झालेले असून रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांना गौरविण्यात आलेले आहे.
सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार संपूर्ण सन 2024 आणि डिसेंबर 2024
सर्वोत्कृष्ट मुद्देमाल निर्गती पुरस्कार सन 2024 आणि डिसेंबर 2024
सर्वोत्कृष्ट NBW वॉरंट बजावणी पुरस्कार संपूर्ण वर्ष 2024 आणि डिसेंबर 2024
सर्वोत्कृष्ट दोष सिद्धी पुरस्कार डिसेंबर 2024