क्राईम न्युज
विडणी 25 फाटा ता फलटण येथे अंधश्रद्धेचा नरबळीचा संशय ; अर्धवट महिलेचा मृत्यदेहाने तालुक्यात उडाली खळबळ

(विडणी /प्रतिनिधी)- विडणी २५ फाटा येथिल ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून ऊसाच्या शेतात गुलाल कुंकू दिवाची वात नारळ काळी बाहुली मिळून आल्याने अंधश्रध्देचा नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
ऊसाच्या शेतात महिलेच्या साडी जवळ नारळ कुंकू गुलाल महिलेचे केस कापलेले तेलाचा दिवा काळी बाहुली सुरी मिळून आल्याने सदर प्रकार आघोरी नरबळी असावा.महिलेचे कंबरे पासून खालचे धड वेगळे होते तर कवटी दोनशे तिनशे मीटर अंतरावर पाण्याच्या पाटात आढळून आले तर मधले धड शोध पोलिस घेत आहेत.