गोखळी (प्रतिनिधी) सरकारच्या सहकार्याने होमिओपॅथिक डॉक्टर आणि कॉलेज चे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील डॉ. बाहुबली शहा प्रशासक महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ होमिओपॅथिक मुंबई दि ५ रोजी पुणे येथे ए एम शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज बेळगावी चे वतीने सत्कार करण्यात आल्यानंतर सत्काराला उत्तर देताना मार्गदर्शन करताना डॉ बाहुबली शहा यांनी राज्यात अनेक ठिकाणी नवीन शासकीय होमिओपॅथिक हॉस्पिटल आणि होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याचा मानस व्यक्त केला.. सध्या CCMP कोर्स पूर्ण केलेले सर्व होमिओपॅथिक डॉक्टर अलोपथिक औषधे देऊन इलाज करण्यास परवानगी आहे त्याचे नवीन परिपत्रक २६ डिसेंबर २४ रोजी प्रसिद्ध झाले आहे.. मात्र अजून पुढे जावून शासकीय रुग्णालयात होमिओपॅथिक औषधे देवून इलाज होत नाही ते करण्यासाठी वेळ लागेल पण प्रयत्न करून लोकांची इच्छा असेल तर सध्याचे सरकार नक्कीच मदत करेल.. यात डॉ रजनीताई इंदलकर व सर्व काऊन्सिल मेंबर चे सहकार्य लाभले. यामुळे शासकीय सेवेत आपले डॉक्टर ना संधी निर्माण करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे.. प्राथमिक सादरीकरण २४९ पानी अहवाल सादर केला असून लवकरच त्याचा पाठपुरावा करून तुम्हा सर्वांच्या सहकार्याने होमिओपॅथिक डॉक्टर ना संधी निर्माण करणारे निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या प्रसंगी पूर्वाश्रमीचे सर्व सहकारी बेळगांव येथे शिकलेले डॉक्टरांच्या वतीने डॉ बाहुबली शहा गौतम करंदीकर डॉ अंजली करंदीकर डॉ सोमनाथ गोसावी डॉ डी के पाटील डॉ सुधीर म्हात्रे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
गौतम करंदीकर यांनी जरा वेगळ्या क्षेत्रात काम करत अमेरिका येथील प्रसिद्ध HTC कॉम्पुटर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर ते डायरेक्टर असा प्रवास यशस्वी करून नुकतेच ते सेवानिवृत्त झाले आहेत.. ते भारतात आल्याचे व बाहुबली शहा यांची प्रशासक पदावर नियुक्ती बद्धल सत्कार समारंभ संपन्न झाला. अंजली करंदीकर याही अमेरिकेत भारतीय व महाराष्ट्रीयन संस्कृती चे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करतात.. या प्रसंगी सर्व मित्रांचे वतीने गौतम करंदीकर डॉ बाहुबली शहा यांना सन्मानपत्र शाल देवून सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ राजू शहा डॉ लाला जाधव डॉ रवी मगदूम डॉ गिरीष देशमुख व डॉ शिवाजी गावडे डॉ प्रदीप देसाई डॉ नरेंद्र व्यास यांनी सहकार्य केले.
तसे पाहिले तर हे गेट टुगेदर च पण जरा हटके..४०/४५ वर्षांनी पुन्हा एकत्र यापूर्वी सर्वजण.२०१५ साली असेच सर्वजण एकत्र आले होते.. पुढची भेट अमेरिका येथे सन २०२७ साली करावी अशी सूचना अनिल ओझर्डे यांनी केली कारणही तसेच आहे १९७७/७८ साली बेळगांव येथे प्रवेश घेवून आपण एकत्र शिकलेल्या विद्यार्थींचे अर्धशतक सन २०२७/२८ मधे पूर्ण होत आहे. गौतम व अंजली करंदीकर यांनी तसे आमंत्रण आजच सर्वांना दिले.