गोखळी (प्रतिनिधी) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील हणमंत वाडी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भव्य मैदानात बालबाजार भरविण्यात आला. यामध्ये चिमुकल्यानी पालेभाज्या, फळभाज्या, मकरसंक्रातीचे साहित्य, स्टेशनरी साहित्य, सौंदर्य प्रसादने, खाण्याचे पदार्थ यामध्ये पाणीपुरी, भेळ, सामोसे, वडापाव, जिलाबी, विविध प्रकारच्या चिक्की, मशरूम इत्यादी प्रकार बाजारात विक्रसाठी ठेवले होते. ग्रामस्थांनी या सर्वांची खरेदी करून चांगल्याप्रकारे सहकार्य केले. गावात आठवडे बाजार भरत नसल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
या उपक्रमाला गावच्या सरपंच सौ रुपाली जाधव, उप सरपंच विक्रमसिंह जाधव , व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विठ्ठल चव्हाण,सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, पालक, ग्रामस्थ,श्रीमंत बाबाराजे खर्डेकर हायस्कुलचे मुख्याध्यापक नाळे सर, सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी यांनी भेट देऊन खरेदी केली.
बालबाजारासाठी शाळेतील श्री गावडे गुरुजी व त्यांच्या सहकारी शिक्षिका श्रीमती झेंडे मॅडम, सौ लोंढे मॅडम व सौ कोकाटे मॅडम यांनी नियोजना साठी मोलाचे योगदान दिले.
सर्वांच्या सहकार्याबद्दल श्री गावडे गुरुजी यांनी सर्वांचे प्रथम स्वागत व शेवटी आभार मानले.अशाप्रकारे बालबाजार उत्तम प्रकारे संपन्न झाला.