क्राईम न्युज
जन्मदात्या आईचाच केला मुलाने खून ; पिंगळी बुद्रुक येथील घटना
आरोपीस दहिवडी पोलिसांनी केली अटक
(जावली/ अजिंक्य आढाव)दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंगळी बुद्रुक गावात रात्री मयत महिला नामे संगीता आनंदराव जाधव वय 52 वर्ष राहणार पिंगळी बुद्रुक या घरात झोपलेले असताना त्यांचा मुलगा आरोपी नामे विशाल आनंदराव जाधव वय 32 वर्षे हा दारू पिऊन घरी आला व आईला जेवायला दे असे म्हणाला. परंतु खूप उशीर झाल्याने व मुलगा दारू पिऊन आल्याचा राग आल्याने आईने मुलास सांगितले की तू तुझ्या हाताने जेवण घे , त्यामुळे आरोपी नामे विशाल जाधव याने दारूच्या नशेत आईला शिवीगाळ व मारहाण करण्यास चालू केली.
जन्मदात्या आईचाच केला मुलाने खून ; आईने हाताने जेवण न दिल्याच्या कारणावरून डोक्यात स्टीलच्या हांड्याने प्रहार करून गंभीर जखमी केल्यामुळे मृत्यू