हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्राईम न्युज

दहिवडी पोलिसांचा अनोखा उपक्रम ; महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन (रेझिंग डे) अनुषंगाने पोलीस ठाण्यात शस्त्र प्रदर्शन व इतर उपक्रमांचे आयोजन

(जावली/ अजिंक्य आढाव) महाराष्ट्र शासनाने दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्य पोलीस उन्नत दिन (रेझिंग डे) म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने दि.2 ते 8 जानेवारी 2025 रोजी दरम्यान महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या उन्नत दिनाच्या संबंधाने विविध कार्यक्रमाचे परिणामकारक व व्यापक स्वरूपात आयोजन करून त्याद्वारे जनतेमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल आणि जनता व पोलीस यांच्यामध्ये समन्वय व सुसंवाद साधता यावा तसेच पोलिसांचे सामाजिक धोरण चांगल्या प्रकारे राबविता यावे यासाठी आज रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते त्याचबरोबर पोलीस ठाण्यातील कायदा सुव्यवस्था अनुषंगाने वापरण्यात येणारे शस्त्रे, दारुगोळा, लाठी, ढाल, हेल्मेट, बेडी यांचे प्रदर्शन आयोजित करून सर्व विद्यार्थ्यांना त्याची माहिती देण्यात आली. त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे बाबत व मोटर वाहन अधिनियम कायदा याचे मार्गदर्शन करण्यात आले व सूचना देण्यात आल्या.

त्याचबरोबर पोलीस ठाण्यात प्रत्येक विभागातर्फे करण्यात येणारे कामकाज, आरोपींना ठेवण्यात येणारे लॉकअप व इतर विभाग दाखविण्यात आले.

सदरचा कार्यक्रम हा माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री समीर शेख सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेला असून याकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, विलास कुऱ्हाडे, प्रकाश इंदलकर, नितीन धुमाळ, नीलम रासकर, पुनम रजपूत, गणेश खाडे, चंद्रकांत शिंदे, महेंद्र खाडे, सहदेव साबळे,गणेश पवार,सरस्वती करचे,ऋतुजा तरटे यांनी विशेष योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!