आपला जिल्हा
राॅयल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
(जावली/अजिंक्य आढाव)-जावली ता.फलटण येथील जाई एज्युकेशन सोसायटी संचलित राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी उत्तम शिक्षण अत्यंत आवश्यक आहे. हे आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यास मदत करते आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवते. याच उत्तम उदाहरण म्हणजे राॅयल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज जावली हे होय सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे
-
यावेळी कार्यक्रमाचा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे याच्यां हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला. या बरोबरच विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन मधे शैक्षणिक क्षेत्राबरोबरच विज्ञान प्रदर्शनात विविध प्रयोगांची सादरीकरण केले होते.कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन शिवलाल गावडे यांनी केले.
उच्च प्रतिचे दर्जेदार शिक्षण आता राॅयल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज जावलीत मिळणार आहे, – गणेश तांबे (आई प्रतिष्ठान संस्थापक)