हि बातमी ईतर भाषेत वाचा
आपला जिल्हा

मनोरुग्णाने पोलिसांच्या डोळ्यात टाकले तिखट ; फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील घटना

(जावली/ अजिंक्य आढाव) – फलटण येथील सदर घटना घडली असून मनोरुग्णांचा समाजाला वाढता धोका आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचारी हे आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते कुणी तक्रारदारांच्या कडून माहिती घेत होते कुणी आरोपींकडे चौकशी करत होते कोणी ठाणे अंमलदार च काम करत होता कुणी आपल्या पोलीस स्टेशनचे ऑफिसचे काम करत होते.

तेवढ्यात अचानक पणे एक इसम हातात पिशवी घेऊन पोलीस स्टेशन आवारामध्ये आला पोलीस स्टेशन आवारामध्ये पोलीस ठाण्यामध्ये प्रवेश करताच सदर इसमाने त्याच्या हातामध्ये असलेल्या पिशवीतील लाल तिखट उपस्थित अधिकारी व कर्मचारी तसेच उपस्थीत नागरिक यांच्या डोळ्यांमध्ये टाकले सदरचा इसम हा शरीराने धष्टपुष्ट व मजबूत बांधायचा होता त्यानंतर सदरचा प्रकार पाहून पोलीस ठाण्यात उपस्थित नागरिक तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी हे गोंधळून गेले आणि त्यांनी सदर इसमाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आजूबाजूला तिखट फेकल्यामुळे त्याच्या जवळही जाऊ शकत नव्हते परंतु पोलिसांनी प्रशिक्षित असलेने त्याला ताब्यामध्ये घेतला पोलिसांच्याच डोळ्यांमध्ये मिरच्या गेल्यामुळे अर्थातच पोलीस चे नागरिकांचे डोळे चुरचुरत असल्याने संयम हरवून गेले आणि त्यांनी सदर व्यक्तीला त्यांनी धडा शिकवण्यास सुरुवात केली त्यावेळेस मी तातडीने त्या ठिकाणी गोंधळ झालेने गेलो आणि पाहिले असता मिरची अशा मोठ्या प्रमाणात फेकलेली होती व सदर इसम हा अ संबंध बडबडत होता माझ्या घराकडे बघता असाच होईल मला काय बांधता एका एकाला ठोकतो टाच खाली घेतो असं म्हणून बडबडत होता सदर व्यक्तीला पोलीस व नागरिक यांना मारहाण न करण्याबाबत आव्हान करून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो धष्टपुष्ट असल्याने तो लवकर काबूमध्ये येत नव्हता त्यामुळे प्रशिक्षण दिल्याप्रमाणे त्याचे हात पाठीमागे बांधण्यात आले व त्याचे पायाला सुद्धा दोराने बांधले परंतु सदर व्यक्ती चौकशीमध्ये काहीही माहिती देत नव्हता उलट त्याचे हे डोळ्यात चटणी गेलेली होती सदर इसमाची डोळ्यातील चटणी पाणी टाकून स्वच्छ धुण्यात आली सर्व पोलीस नागरिकांनी स्वतःचे डोळे धुतले त्यानंतर सदर इसमाकडे चौकशी केली असता तो काही माहिती देत नव्हता त्यानंतर सदर इसमाचे छायाचित्र हे पोलीस पाटील ग्रुप वर टाकून सदर इसमा बाबत चौकशी केली असता नंतर माहिती मिळाली की सदर इसम हा फरांदवाडी गावातील असून त्याचे नाव मंगेश ननावरे वय 35 वर्षे असे असून सदर इसमाची ची पत्नी त्याच्या या मनोविकृत वागण्यामुळे सोडून गेली होती तसेच त्याचे आई-वडील मृत झालेले होते दोन वर्षांपूर्वी तो मनोरुग्णालयामध्ये दाखल होता परंतु त्यांनी आता औषध घेण्याचे सोडल्यामुळे त्याला अशा प्रकारचे हिंसक कृत्य तो करत होता त्यानंतर मनोरुग्ण सेवा मंडळाचे मनोज गावडे गोखळी यांना मी दूरध्वनी लावून चौकशी केली असता ते स्वतः त्या ठिकाणी आहे व सदर इसमाला मनोरुग्ण समजून त्याला उपचार करणे गरजेचे असल्याने तात्काळ डॉक्टर खराडे यांना फोन लावला कारण तो दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडेच उपचार घेतले होते त्यामुळे त्याचा इतिहास माहीत होता दोन वर्षांपूर्वी सुद्धा तो असाच हिंसक मनोरुग्ण पद्धतीने वागत होता त्यामुळेच त्याची पत्नी घेऊन माहेरी गेलेली होती तो आता उपचारातून आल्यानंतर गोळ्या औषध बरोबर घेत नसल्याने त्याला परत तो मनोरुगण अवस्थेमध्ये गेलेला होता त्यामुळे त्याच्यापासून समाजाला धोका होणार हे निश्चित माहीत होते.

अशावेळी त्याचाही जीव वाचला पाहिजे आणि समाजालाही त्याच्यापासून कुठलाही धोका होणार नाही हे काम पोलीस चे होते परंतु पोलिस ने अतिशय कौशल्याने संयमाने ही परिस्थिती हाताळली त्यानंतर सदर इसमाला डॉक्टर खराडे यांच्याशी संपर्क करून त्यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी त्याला अंतर रुग्ण म्हणून भरती करण्यात आले व त्याला सोमवारी मेंटल रुग्णालय येरवडा या ठिकाणी भरती करण्याची तजवीज ठेवलेली आहे पोलिसांनी ही परिस्थिती अतिशय कौशल्याने व संयमाने हाताळलेली आहे आज या परिस्थितीमध्ये जर सदर इसमाला काबू केला नसता तर समाजातील इतर लोकांनाही त्याच्यापासून धोका झाला असता किंवा समाज चिडून त्याच्या जीवाला धोका निर्माण केला असता
म्हणून मनोरुग्ण इसम कडे दुर्लक्ष करू नका आता खाजगी मनोरुग्ण डॉ प्रतेक शहरात आहेत.

सामाजिक खाजगी कारणातून तसेच आजचे धाक धाकी चे जर तणाव जाणवला तर ततकल दाखवून घ्या म्हणजे पुढे कॉम्प्लिकेशन होणार नाहीत मनोरुगाने खुनासारखे घटना केले ले आहेत त्यातून कायदा सुव्यवस्थेच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत.

आज आपल्या प्रत्येकाला अशी मनोरुग्ण रस्त्यावर तसेच आपल्या गावात दिसून येतात त्यांच्यावर तात्काळ उपचार करावेत किंवा पोलीस त्यांना त्याबाबतीत कळवावेत व पोलिसांच्या मदतीने त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्यात येईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!