(जावली/अजिंक्य आढाव)- महाराष्ट्र तसेच इतर राज्यातुन चोरीस गेलेले व गहाळ झालेले एकुण १९ लाख रुपये किंमतीची ७८ मोबाईल शोध घेण्याची कामगिरी दहिवडी पोलिस ठाण्याने केली आहे. सदर मोबाईल संच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले.
पोलिस अधीक्षक समीर शेख अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी हरवलेली मोबाईल शोध घेण्यासाठी दहिवडी पोलिस ठाण्याअंतर्गत विशेष पथक स्थापन केले.पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी सीईआयआर पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे हरविलेल्या मोबाईल बाबतची माहिती प्राप्त केली.
महाराष्ट्र तसेच इतर राज्यातुन चिकाटीने शोधमोहीम राबवुन नागरिकांंचे गहाळ चोरी झालेले एकूण ७८ मोबाईल परत मिळवले ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत जामदार, पोलिस हवालदार बापू खांडेकर व श्रीनिवास सानप , पोलिस नाईक नितीन धुमाळ , पोलिस कॉन्स्टेबल नीलेश कुदळे, महेंद्र खाडे असिफ नदाफ व महेश पवार (सायबर ) यांच्या पथकाने केली आहे.