(जावली/ अजिंक्य आढाव)- फलटण पूर्व भागातील अल्प कालावधीत शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रिडा क्षेत्रात महाराष्ट्रात नाव लौकिक असलेले राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली यांच्या वतीने दि.४/१/२०२५ शनिवारी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.अमोल चवरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
जाई एज्युकेशन सोसायटीची स्थापना सन २०१५ साली करण्यात आली. सध्या देशभरात शैक्षणिक क्रांती घडत असताना ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी माध्यमाचे ज्ञान मिळावे या करता वयाच्या २३ व्या वर्षी प्रा. अमोल चवरे यांनी इंग्लिश स्कूल जावली मधे सुरू केले, सध्या जावलीसह बरड ,मिरढे,कुरवली, राजुरी, आदंरूड,तिरकवाडी तसेच फलटण भागातील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.
ज्ञानगंगा बरोबर विद्यार्थी मैदानी खेळात महाराष्ट्र,गोवा , गुजरात या ठिकाणी स्पर्धेसाठी सहभागी होत शाळेला गोल्ड, कांस्य, ब्रांन्झ पदके मिळवून दिली आहेत.
या बरोबरच विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव मिळावा या करता वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्नेहसंमेलन संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे साहेब तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे धनगर व शेगर महासंघ सचिव शिवलाल गावडे साहेब उपस्थित राहणार आहेत .
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अमोल चवरे संस्थापक जाई एज्युकेशन सोसायटी,कांचन चवरे संचालिका, प्राचार्य समीर गावडे, शाळां व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष – दत्तात्रय गावडे,माता- पालक अध्यक्ष रहिना फैय्याज शेख, परिवहन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय लंगुटे यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलना चे आयोजिन केलं आहे.