(सतिश कर्वे/ विडणी) – विडणी येथिल उत्तरेश्वर हायस्कुलच्या मुलांनी आठवडा बाजारातून केली सत्तर हजारांची उलाढाल झाल्याचं पाहिला मिळाले.
विडणी येथिल उत्तरेश्वर हायस्कुल व ज्यु.कॉलेजच्या मुलांना शैक्षणिक ज्ञाना बरोबर व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी आठवडा बाजार भरवण्यात आला होता.यावेळी डॉ.बाळासाहेब शेंडे हणमंतराव अभंग संतोष खटके मारुती नाळे राजाभाऊ पवार डॉ.सुचिता शेंडे प्राचार्या शुभांगी शिर्के गौरी जाधव विलास अभंग बशिर शेख किसन शेंडे बाळकृष्ण लाड लक्ष्मण भुजबळ बाळासो पवार मुरलीधर जगताप आदीची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यालयाच्या मैदानात बाजार भरविण्यात आला होता याठिकाणी फळे कडधान्ये पालेभाज्या खाऊ गल्ली विविध झाडे रोपवाटीका असे वेग वेगळे विभाग केले होते.
या बाजारात शंभर पेक्षा अधिक मुलांनी सहभागी झाले होते.मुलाना वजन मापे पैशाची देवाण घेवाण वेगवेगळ्या भाजीपाला मध्ये असणारे प्रथिने शरिराला कसा उपयोगी आहेत याची माहीती देत होती. शुध्द आहार शाकाहार या बाबत ग्राहका मध्ये जनजागृती करणेत आली.या आठवडा बाजारास पालक ग्रामस्थ महिला वर्गानी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
फोटो – आठवडा बाजारात मुलांकडून खरेदी करताना ग्रामस्थ महिला वर्ग(छाया सतिश कर्वे)