हि बातमी ईतर भाषेत वाचा
क्रीडा व मनोरंजन

पुस्तकांच्या वाचनामुळे आयुष्याला योग्य दिशा मिळते – प्रा.रामदास अभंग

(विडणी /सतिश कर्वे )- लोकांनी आपले ज्ञान वाटत राहावे यासाठी विविध पुस्तकांचे वाचन करावे वाचनामुळे आयुष्याला योग्य दिशा मिळते असे मत विमलबाई गरवारे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रामदास अभंग यांनी व्यक्त केले.

उत्तरेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी काही दिवस शिक्षक म्हणून सेवा रामदास अभंग यांनी केली.सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यालयास ११हजार रुपयांची देणगी देण्यात आली.

विडणी येथिल उत्तरेश्वर हायस्कुल मध्ये विविध स्पर्धेत मुलांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने बक्षीस वितरण कार्यक्रमा वेळी ते बोलत होते यावेळी डॉ.बाळासाहेब शेंडे हणमंतराव अभंग पी एम पवार (सर) डॉ.सुचिता शेंडे शुभांगी शिर्के राजीव पवार लक्ष्मण भुजबळ बाळासाहेब लाड बशिर शेख किसनराव शेंडे मुरलीधर जगताप आदीची प्रमुख उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले की वाचना बरोबर नियमित व्यायाम ठेवावा यामुळे आरोग्य निरोगी राहते. मनातील असणारी भिती दूर करुन लोकांनी समाजापुढे बोलणे व्यक्त होणे गरजेचे आहे यामुळे विचारांची देवाण घेवाण होत असते.अलीकडे राजकीय भाषणे ऐकायला गर्दी असते.परंतु चांगले वक्त्याचे विचार ऐकायला लोक पाठ फिरवीत असतात.हे मोठे दुर्दैव्य असून लोकांनी चांगली भाषणे विचार ऐकल्याने आपल्या जिवनात बदल घडत असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुञसंचलन वैभव शेंडे सर यांनी केले प्रास्तविक धनाजी नेरकर सर यांनी केले तर आभार राजेंद्र आगवणे सर यांनी मानले

फोटो – (उत्तरेश्वर विद्यालयात मुलांना मार्गदर्शन करताना रामदास अभंग सर व इतर मान्यवर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!